This film will be played by the Vaibhav Talavidi, who will be in the role of this film in Dubai | वैभव तत्ववादीच्या या सिनेमाच शूटिंग होणार दुबईला, सिनेमात अशी असणार भूमिका

मराठी इंडस्ट्रिमधला चॉकलेटबॉय आणि रसिकांच्या विशेषतः मुलींच्या गळ्यातला ताईत बनलेला 'वैभव तत्ववादीचा आणखी एक नवा कोरा चित्रपटाची ट्रीट रसिकांना देण्यासाठी सज्ज झाला आहे.विशेष म्हणजे या सिनेमात वैभव कोणत्याही रोमँटिक भूमिकेत नसून एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला दिसणार आहे.या सिनेमात तो एका आर्किटेकची भूमिका साकारणार अाहे. ‘कॉफी आणि बरंच काही’ या चित्रपटाचेे दिग्दर्शक प्रकाश कुंटे हेच या नव्या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून पुढच्या महिन्यापासून या सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात होणार असल्याचे कळतंय.

'कॉफी आणि बरंच काही','मिस्टर आणि मिस सदाचारी','व्हॉटसअप लग्न'  अशा अनेक सिनेमातून वैभवने रोमँटिक भूमिकेतून महाराष्ट्रातील तरुणींना याड लावलंय.वैभवने फक्त मराठीच नाहीतर हिंदी सिनेमातही आपल्या भूमिकेने वेगळे स्थान निर्माण केले आहे.वैभवने 'हंटर','लिपस्टिक अंडर माय बुरखा' अशा बॉलिवूड सिनेमांमधूनही वैभवने कामं केली आहेत.विशेष म्हणज संजय लीला भन्साली यांच्या गाजलेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातही काम केले होते. या सिनेमात त्याने  माजी आप्पा ही भूमिका साकारली होती.मराठीत आपल्या अभिनयाने तरुणींसह रसिकांची मनं जिंकणारा वैभव चिमाजी आप्पाच्या भूमिकेमुळे भलताच भाव खाऊन गेला होता.आता 'मणिकर्णिका' या सिनेमातील वैभव पूरण सिंह या व्यक्तीरेखेलाही चिमाजी आप्पा या भूमिकेप्रमाणे न्याय देण्याचा आणि रसिकांची मने जिंकण्याचा वैभवचा मानस आहे.या नव्या चित्रपटाविषयी बोलताना वैभवने सांगितले की, आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा या चित्रपटातील माझी आर्किटेकची भूमिका फारच वेगळी आहे.त्यामुळे या चित्रपटासाठीही मीसुद्धा फार उत्सुक आहे.दरम्यान,या वैभवच्या नव्या मराठी चित्रपटाचं चित्रिकरण पुढच्या महिन्यापासून मुंबई आणि दुबईत होणार असून सिनेमाचे नावगुपित ठेवण्यात आले आहे.

अभिनय कौशल्याची छाप पाडणाऱ्या वैभव तत्वावादीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय.महाराष्ट्राचा मोस्ट डिझायरेबल मॅन ऑफ २०१८ हा पुरस्कार त्याला मिळाला असून नुकतीच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.आपल्या स्टाईल स्टेटमेंटमुळे तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या वैभव तत्ववादीसोबत या स्पर्धेत ५० मॉडेल्स आणि अभिनेते सामिल झाले होते. या साऱ्या मॉडेल्स आणि अभिनेत्यांना मागे टाकून वैभवने महाराष्ट्राचा मोस्ट डिझायरेबल मॅन ऑफ २०१८ चा पुरस्कार मिळवला.

Web Title: This film will be played by the Vaibhav Talavidi, who will be in the role of this film in Dubai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.