Fat to fit: That's why Sai Tamhankar's weight loss is due to this | Fat to fit : या कारणामुळेच सई ताम्हणकरने केले वजन कमी

सिनेमा किंवा मालिकेतील भूमिकेसाठी अभिनेत्रीदेखील परफेक्ट झीरो फिगरसाठीही अहोरात्र मेहनत करतात,डायट करतात हे सुद्धा आपण पाहिले आहे.हे एखाद्या सिनेमासाठी किंवा मालिकेसाठी कलाकार करत असतात.मात्र काही कलाकार असे असतात की व्यायाम,फिटनेस हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असतो.आपल्या बॉडीवर हे कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात.फिट राहण्यासाठी कलाकार जिममध्ये घाम गाळत असतात.सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तर प्रत्येक कलाकार फिटनेसवर लक्ष केंद्रीत करतो.मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे आपल्या फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेत असतात.या लिस्टमध्ये मराठमोळी सई ताम्हणकरचंही नाव जोडले जाते.'वजनदार'सिनेमासाठी भूमिकेसाठी तिने वजन वाढवले होते. सईने पुन्हा आपले वजन कमी केले आहे.नेहमीच सौंदर्य,अदा आणि उत्तम अभिनयाचा अनोखा मेळ सईमध्ये दिसत असल्याने रसिक तिचं तोंडभरुन कौतुक करतात.सईने आजवर विविध भूमिकांमधून रसिकांची मनं जिंकली आहेत.दमदार भूमिका साकारणारी सई तितकीच स्टायलिश आहे.तिने आपल्या स्टाईलनं रसिक मनात अढळ स्थान मिळवलं आहे.सध्या सईने तिचे वजन खूप कमी केले आहे आणि त्यामुळे ती अजूनच ग्लॅमरस दिसत आहे.जीम,डाएटींगचा आधार घेत सईने स्वतःला फिट ठेवले आहे.सईला फास्टफुड आणि गोड पदार्थ अजिबात आवडत नाही असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.'नो एंट्री पुढे धोका आहे' म्हणत मराठीत बिकनी कल्चर प्रसिद्ध करणारी सईचा बिकनी अवतारही रसिकांना चांगलाच भावला होता.नेहमीच तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो क्लिक करत रसिकांची वाहवा मिळवत असते.ऑन एंड ऑफ स्क्रीन बोल्ड लूकमुळे चर्चेत असणारी सई प्रत्यक्ष जीवनातही बिनधास्त आणि रोखठोक आहे.ग्लॅमरस अंदाज असो किंवा मग तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच असतो.रिल लाईफ असो किंवा मग रिअल लाईफ नेहमीच ती तिच्या वेगवेगळ्या स्टायलिश लूकने रसिकांना घायाळ करत असल्याचे पाहायला मिळते.सईच्या फोटो शूटचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून तिच्या फॅन्सने या फोटोंना भरभरून प्रतिसाद दिला आहे.

Also Read:Fat to fit :कोरिओग्राफर गणेश आचार्यने असे केले तब्बल ८५ किलो वजन कमी !
Web Title: Fat to fit: That's why Sai Tamhankar's weight loss is due to this
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.