'Faster Fane' became the favorite movie of Maharashtra | ‘फास्टर फेणे’ ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट
‘फास्टर फेणे’ ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट
महाराष्ट्रातील एकमेव मराठी व्युव्हर्स चॉईस अवॉर्ड्स महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१७ या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात नुकतेच २०१७ च्या ब्लॉकबस्टर सिनेमांचे यश साजरे केले गेले.मराठी सिनेसृष्टीतील ख्यातनाम कलाकारांच्या उपस्थितीत प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणा-या कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचा गौरव करणारा पुरस्कार सोहळा शानदार रंगला. अमृता खानविलकर, सिध्दार्थ जाधव,शरद केळकर आणि इतर कलाकारांच्या बहारदार परफॉर्मन्सेसनी या सोहळ्याची रंगात अजूनच वाढवली.वैभव तत्ववादी आणि अमेय वाघ यांनी त्यांच्या अप्रतिम सूत्रसंचालनानी प्रत्येकाचे मनोरंजन केले.मराठी इंडस्ट्रीतील महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांनी झी स्टुडिओज निर्मित फास्टर फेणे या चित्रपटाला पसंती दर्शवली आणि या चित्रपटाने १ नव्हे तर चक्क चार पुरस्कार पटकावले.आदित्य सरपोतदार यांना महाराष्ट्राचा फेव्हरेट दिग्दर्शक,अमेय वाघ याला महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता तसेच स्टाईल आयकॉन,गिरीश कुलकर्णी यांना महाराष्ट्राचा फेव्हरेट खलनायक या पुरस्कारांनी गौरवण्यात आले,तसेच महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट २०१७ हा पुरस्कार पटकावल्यावर संपूर्ण फास्टर फेणे टीमने त्यांचा आनंद व्यक्त केला.


महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०१७ च्या विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे:

• महाराष्ट्राचा फेव्हरेट दिग्दर्शक- आदित्य सरपोतदार (फास्टर फेणे)
• महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट- फास्टर फेणे
• महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता- अमेय वाघ (फास्टर फेणे)
• महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री-सई ताम्हणकर (जाऊं द्या ना बाळासाहेब)
• महाराष्ट्राचा फेव्हरेट साहाय्यक अभिनेता- सचिन खेडेकर (मुरांबा)
• महाराष्ट्राची फेव्हरेट साहाय्यक अभिनेत्री- शिल्पा तुळसकर (बॉयज)
• महाराष्ट्राचा फेव्हरेट नवोदित अभिनेता- अभिनय बेर्डे (ती सध्या काय करते)
• महाराष्ट्राची फेव्हरेट नवोदित अभिनेत्री- आर्या आंबेकर (ती सध्या काय करते)
• महाराष्ट्राचा फेव्हरेट खलनायक- गिरीश कुलकर्णी (फास्टर फेणे)
• महाराष्ट्राचा फेव्हरेट गायक- कौस्तुभ गायकवाड आणि जनार्दन खंदळकर (लग्नाळू - बॉयज)
• महाराष्ट्राची फेव्हरेट गायिका- आर्या आंबेकर (हृद्यात वाजे समथिंग - ती सध्या काय करते)
• महाराष्ट्राचे फेव्हरेट गीत- हृदयात वाजे समथिंग (ती सध्या काय करते)
• महाराष्ट्राचा फेव्हरेट पॉप्युलर फेस- सई ताम्हणकर
• महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन- अमेय वाघ
Web Title: 'Faster Fane' became the favorite movie of Maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.