This famous Marathi actor directed the film | हा प्रसिद्ध मराठी अभिनेता करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

अभिनयक्षेत्रात यश मिळवल्यानंतर दिग्दर्शनाकडे वळणारे अनेक कलाकार मराठी इंडस्ट्रीत आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद ओक, पुष्कर श्रोती, मनवा नाईक, अंकुश चौधरी यांनी एक दिग्दर्शक म्हणून देखील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसादही मिळाला आहे. आता या अभिनेत्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आणखी एक मराठी अभिनेता दिग्दर्शनक्षेत्रात आपले भाग्य आजमावणार आहे. हा दिग्दर्शक आपल्या चित्रपटाची घोषणा लवकरच करणार आहे.
लोकेश गुप्तेने आजवर अनेक हिंदी, मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. खुलता कळी खुलेना, जुळून येती रेशीम गाठी, आभास हा, लज्जा, कुलवधू, वादळवाट, अग्निशिखा, बेधुंद मनाच्या लहरी यांसारख्या मालिकांमधील त्याच्या भूमिका गाजल्या आहेत. मुंगळा, प्रेमसूत्र, डावपेच, डॅम्बिस, प्रतिबिंब, उलाढाल या चित्रपटातील त्याच्या भूमिकांचे कौतुक झाले आहे. त्याने सोनाक्षी सिन्हाच्या अकिरामध्ये देखील खूप चांगली भूमिका साकारली होती.

Lokesh Gupte

लोकेश गुप्ते आता अभिनयानंतर दिग्दर्शनाकडे वळणार आहे. तो एका चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटाची निर्मिती देवी सातेरी प्रोडक्शन करणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता झळकणार असल्याची चर्चा आहे. हा अभिनेता कोण असणार याविषयी चित्रपटाच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. पण या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण लवकरच होणार असून या पोस्टर अनावरणच्या सोहळ्यात या चित्रपटातील नायक कोण असणार याची घोषणा केली जाणार आहे. 
मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगले विषय सध्या हाताळले जात आहेत. तसेच अनेक मराठी चित्रपट बॉलिवूडपेक्षाही चांगली कमाई करत आहेत. सैराट या चित्रपटाची तर बॉलिवूडमध्ये देखील चांगलीच चर्चा रंगली होती. बॉलिवूडमधील अनेक कलाकार मराठी चित्रपटांकडे आता वळले आहेत. प्रियांका चोप्रा, अजय देवगण यांसारखे बॉलिवूडमधील स्टार देखील मराठी चित्रपटांची निर्मिती करत आहेत. तसेच सलमान खान, प्रियांका चोप्रा, अजय देवगण यांनी मराठी चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. आता कोणता बॉलिवूडचा अभिनेता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 

Web Title: This famous Marathi actor directed the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.