This famous Bollywood actress will be seen in the Marathi film | ​ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री झळकणार मराठी चित्रपटात

मराठी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगले विषय सध्या हाताळले जात आहेत. तसेच अनेक मराठी चित्रपट बॉलिवूडपेक्षाही चांगली कमाई करत आहेत. सैराट या चित्रपटाची तर बॉलिवूडमध्ये देखील चांगलीच चर्चा रंगली होती. बॉलिवूडमधील अनेक कलाकार मराठी चित्रपटांकडे आता वळले आहेत. प्रियांका चोप्रा, अजय देवगण यांसारखे बॉलिवूडमधील स्टार देखील मराठी चित्रपटांची निर्मिती करत आहेत. तसेच सलमान खान, प्रियांका चोप्रा, अजय देवगण यांनी मराठी चित्रपटांमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. आता आणखी एक बॉलिवूडची अभिनेत्री मराठी चित्रपटात काम करण्यास सज्ज झाली आहे.
अभिनेत्री सारिका यांनी आजवर गीत गाता चल, खुशबू, जानी दुश्मन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी पारध या मराठी चित्रपटात देखील काम केले होते. आता अनेक वर्षांनंतर त्या मराठी चित्रपटांमध्ये परत येणार आहेत. रिस्पेक्ट या चित्रपटात सारिका यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. या चित्रपटासाठी सारिका यांचे डबिंग नुकतेच संपले असून दिग्दर्शक किशोर बेळेकरने फेसबुकच्या माध्यमातून प्रेक्षकांना हे सांगितले आहे. त्याने सारिकांसोबतचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. 

Sarikaसारिकाने चित्रपटांप्रमाणे मालिकांमध्ये देखील काम केले आहे. युद्ध या मालिकेमधून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत अमिताभ बच्चनसोबत त्यांची जोडी जमली होती. त्यानंतर डर सबको लगता है या मालिकेत देखील त्या झळकल्या होत्या. 
किशोर बेळकरने येडा या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. आशुतोष राणाची मुख्य भूमिका असलेल्या येडा या चित्रपटाचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यामुळे त्याच्या रिस्पेक्ट या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लोकांना लागली आहे. 
सारिका या प्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांच्या पूर्वपत्नी आहेत. अभिनेता कमल हसन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत तर त्यांना सुपरस्टार मानले जाते. कमल हासन यांनी केवळ दाक्षिणात्य इंडस्ट्रीतच नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीत देखील आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे.

Also Read : या अभिनेत्रीने आपल्या अभिनेता पतीच्या चित्रपटाच्या यशासाठी केले होते टक्कल
Web Title: This famous Bollywood actress will be seen in the Marathi film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.