Exculsive - Alcove will do Criminal Biopic | Exculsive - अलका कुबल करणार बायोपिक

बेनझीर जमादार
              
सध्या बॉलिवुडमध्ये बायेपिक येण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. सुलतान पाठोपाठ एक से एक बायोपिक मैदानात उतरण्यास तयार झाले आहेत.या तुलनेत मराठी इंडस्ट्रीमध्ये बायोपिक येण्याचे प्रमाण फार कमी आहेत. बायोपिक असले तरी सामाजिक कामांमध्ये झोकून देणाºया सामाजिक व्यक्तीमहत्वांवर बायोपिक तयार केले  जातात. जसे की, डॉ. प्रकाश बाबा आमटे या मराठी बायोपिक चित्रपटानंतर आता, समाजाला आदर्श घालू पाहणारे डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे. या चित्रपटात मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रेक्षकांची मनावर आधिराज्य गाजविणारी अभिनेत्री अलका कुबल पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्यांनी डॉ. तात्याराव लहाने यांच्या आईची भूमिका साकारली आहे. या भूमिकेविषयी लोकमत सीएनएक्सला अलका सांगतात, डॉ. तात्याराव लहाने हे व्यक्तीमहत्व सर्वानाच माहित आहे. त्यांनी वैदयकीय क्षेत्रात अनेक विक्रम केले आहेत.तसेच आनंदवनातील कुष्ठरोगांसाठी त्यांनी केलेले सामाजिक कार्य हे डोळयांना पारणे फेडणारे आहे. अत्यंत गरीबीमधून हा माणूसवर आलेला आहे. त्यांच्या या यशस्वी करिअरमध्ये आई,भावंडे यांचे खूप मोठे योगदान आहे. म्हणून त्याच्याविषयी मला नितांत आदर आहे. अशा या मोठया व्यक्तीच्या आईच्या भूमिका मला करण्यास मिळाली याचा खूप आनंद होत आहे. 


Web Title: Exculsive - Alcove will do Criminal Biopic
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.