Exclusive! Swapnil Joshi again came in Daddy, Joshi came to the family, the cute baby's arrival | Exclusive! ​स्वप्निल जोशी पुन्हा झाला डॅडी, जोशी कुुटुंबात झाले गोंडस बाळाचे आगमन

महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी पुन्हा एकदा एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. होय, स्वप्नील दुसऱ्यांदा डॅडी बनला असून, त्याची पत्नी लीनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. स्वप्नीलनेच ही गोड बातमी ‘सीएनएक्स लोकमत’ला दिली. सीएनएक्सशी बोलताना त्याने सांगितले की, ‘होय, इट्स बेबी बॉय... लिनाने नुकतेच एका गोंडस बाळाला जन्म दिला असून, तिची आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे.   

स्वप्नीलने आपल्या हटके अभिनय शैलीने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच प्रेक्षक त्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणून संबोधतात. दरम्यान, स्वप्नील आणि लिना १६ डिसेंबर २०११ ला लग्नाच्या बंधनात अडकले होते. लिना ही व्यवसायाने डेन्टिस्ट असून, ती मूळची औरंगाबाद येथील आहे. या दाम्पत्याला मायरा नावाची पहिली मुलगी असून, ती आता दीड वर्षाची झाली आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनामुळे संपूर्ण जोशी कुटुंब आनंदी झाले आहे. विशेष म्हणजे कालच स्वप्नीलच्या आईचा वाढदिवस होता. त्यामुळे आता आजी आणि नातवाचा वाढदिवस केवळ एकाच दिवसाच्या अंतरावर येणार आहे. 

स्वप्नीलने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना त्याकाळी प्रचंड पसंतीस आली होती. पुढे ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वत्र कौतुक झाले होते. ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्र मात स्वप्नीलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना बघावयास मिळाला. या कार्यक्र मातील त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले.

त्यामुळेच स्वप्नीलला आज मराठीतील सुपरस्टार असेही संबोधले जाते. मराठीतील ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘भिकारी’ यांसारखे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आहेत. सध्या ‘मुंबई-पुणे-मुंबई-२’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात तो व्यस्त आहे. 
Web Title: Exclusive! Swapnil Joshi again came in Daddy, Joshi came to the family, the cute baby's arrival
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.