Exclusive: Rakesh Bapat is coming out with 'Rajan' thunder! | Exclusive : ​राकेश बापट घेऊन येतोय ‘राजन’चा थरार!

भरत सुनंदा लिखित- दिग्दर्शित ‘राजन’ या सिनेमाचे टीजर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. ‘राजन कमिंग सून’ असे सांगणा-या या टीजर पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती.  साहजिकच हा ‘राजन’ कोण? याची उत्सुकताही होतीच. मराठी सिल्वर स्क्रीनवरील या चित्रपटात राजनची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण  प्रेक्षकांना पडलेल्या या प्रश्नाचा लवकरच उलगडा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी आणि हिंदीचा देखणा अभिनेता राकेश बापट या सिनेमात राजनची भूमिका साकारणार असल्याचे समजते. हिंदीत विशेष ओळख निर्माण करणा-या राकेशने मराठीतही आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. ‘रिदम मुव्हीज प्रस्तुत वंश एंटरप्राईजेस’ यांची निर्मिती असलेला हा सिनेमा खरे तर‘राजन’  या शीर्षकामुळेच अधिक चर्चेत आला आहे.  मात्र, हा सिनेमा कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यावर बेतलेला नसून तत्कालीन काळातील गुंडगिरीवर हा सिनेमा भाष्य करणारा आहे.  वामन पाटील, दिप्ती बनसोडे आणि सुरेखा पाटील यांची असलेल्या या चित्रपटात,तुषार पटेल यांनी कार्यकारी निर्मात्याची भूमिका पार पाडली आहे. राकेश बापट राजनच्या भूमिकेत कसा दिसेल, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेल, तोपर्यंत प्रतीक्षा!! काय?
Web Title: Exclusive: Rakesh Bapat is coming out with 'Rajan' thunder!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.