Exclusive Neha in Malayalam film after Malayalam | Exclusive नेहा मल्याळम नंतर कॅनेडियन चित्रपटात

  प्रियांका लोंढे

             निळकंठ मास्तर, युथ यासारख्या चित्रपटांमध्ये भुमिका साकारुन अभिनेत्री नेहा महाजन प्रेक्षकां समोर आली. निळकंठ मास्तर सारख्या ऐतिहासिक चित्रपटातील दमदार अभिनयामुळे नेहा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. तर तिच्या या अभिनयाचे सर्वत्र कौतुक देखील झाले. नूकत्याच प्रदर्शित झालेल्या युथ मधील तिच्या रोलला देखील तिच्या चाहत्यांकडुन वाहवा मिळाली. तर मल्याळम चित्रपटातील तिच्या न्युड सीन्सची तर चांगलीच चर्चा झाली अन नेहा महाजन हे नाव एकदम लाईम लाईटमध्ये आले. द पेंटेड हाऊस या चित्रपटातील हे सीन्स असुन ते मी केवळ त्या भुमिकेची गरज म्हणुन केल्याचे स्पष्टीकरण नेहाने दिले होते. सध्या नेहा काय करीत आहे, कोणत्या चित्रपटांमध्ये ती आपल्याला दिसणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.  मल्याळम चित्रपटानंतर आता  नेहाने डायरेक्ट उडी घेतली आहे इंटरनॅशनल चित्रपटामध्ये.  सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत नेहाने स्वत: या बातमीचा खुलासा केला असुन ती म्हणाली मी आता एका कॅनेडियन चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नेहा सध्या परदेशात या चित्रपटाचे शुटिंग करीत असुन ती लवकरच भारतात परतणार असल्याचेही तीने सांगितले. या चित्रपटाच्या कथेविषयी तर नेहाने काहीच उलगडा केला नसुन या चित्रपटाचे नाव देखील गुलदस्त्यात आहे. द पेंटेड हाऊस ची चर्चा तर सर्वत्रच झाली आहे. आता पाहुयात की या कॅनेडियन चित्रपटात नेहा काय कमाल करतीये याच्याच प्रतिक्षेत तिचे चाहते नक्कीच असतील. 
Web Title: Exclusive Neha in Malayalam film after Malayalam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.