Exclusive : ऋत्विक केंद्रेचा नवा लूक पाहिलात का?, जाणून घ्या याबद्दल

By तेजल गावडे | Published: December 18, 2018 07:36 PM2018-12-18T19:36:50+5:302018-12-18T19:42:29+5:30

मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता ऋत्विक दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत अभिनय करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Exclusive: Did You See New Look Of The Dry Day Movie Serial Actor Rutwwik Kendre?, Check Out Here | Exclusive : ऋत्विक केंद्रेचा नवा लूक पाहिलात का?, जाणून घ्या याबद्दल

Exclusive : ऋत्विक केंद्रेचा नवा लूक पाहिलात का?, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext
ठळक मुद्देऋत्विक केंद्रे करणार साऊथ इंडस्ट्रीत एन्ट्रीऋत्विक गिरवतोय मार्शल आर्ट्सचे धडे

'मानसीचा चित्रकार तो' या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता ऋत्विक केंद्रेने मराठी सिनेसृष्टीत व नाट्यसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्याच्या 'मोहे पिया' या हिंदी नाटकाला देशभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याचा 'ड्राय डे' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या सिनेमातील त्याचे काम प्रेक्षकांना खूप भावले. त्यानंतर आता त्याचा सरगम हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता ऋत्विक दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत अभिनय करण्यासाठी सज्ज झाला आहे आणि या चित्रपटासाठी त्याने नुकतीच लुक टेस्ट दिली असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ऋत्विक दाक्षिणात्य सिनेसृष्टीत लवकरच पदार्पण करणार असून नुकतेच त्याने या चित्रपटासाठी लूक टेस्ट दिल्याचे समजते आहे.

या चित्रपटासाठी तो खूप मेहनत घेतो आहे. तसेच तो मार्शल आर्ट्सचे देखील प्रशिक्षण घेतो आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी सध्या तो फिटनेसकडे खूप लक्ष देतो आहे. या चित्रपटाचे शीर्षक व कथानकाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. एकंदरीत तो या सिनेमासाठी घेत असलेली मेहनत पाहता या चित्रपटातील त्याची भूमिका दमदार असणार आहे हे नक्की. सध्या तो वावरत असलेला लूक या सिनेमातील असल्याचे बोलले जात आहे. याबद्दल अधिकृतरित्या ऋत्विककडून जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. 

छोट्या पडद्यावरील 'मानसीचा चित्रकार तो' या मालिकेत 'विहान'ची भूमिका साकारणारा ऋत्विक केंद्रे प्रेक्षकांचा लाडका बनला त्याच्या भूमिकेमुळेच त्याने रसिकांचे यश संपादन केले. सुप्रसिद्ध  नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांचा मुलगा असलेल्या ऋत्विकला अभिनयाचे बाळकडू  घरातून लाभले होते. लहानपणापासूनच अभिनयाचे संस्कार झाले असल्यामुळे  ऋत्विक जाहिरात, नाटक, मालिका, सिनेमा या क्षेत्रांमध्ये अगदी बिनधास्त वावरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे.

Web Title: Exclusive: Did You See New Look Of The Dry Day Movie Serial Actor Rutwwik Kendre?, Check Out Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.