Exclusive Amey Mad series photoshoot | Exclusive अमेयचे मॅड सिरिज फोटोशुट

प्रियांका लोंढे
         
           फोटोशुट करायला कोणाला आवडत नाही. कॅमेरा समोर आला की लगेचच पोझ देऊन झक्कासपैकी फोटो काढणारे अनेकजण आपल्याला पहायला मिळती. अन सेलिब्रिटींची तर बातच और. फॉर चेंज म्हणुन कींवा एखाद्या भुमिकेसाठी या ताºयांना फोटोशुट करण्याची भारी संधीच मिळत असते. परंतू काही तारे असे असतात ज्यांना फोटोसेशन करायला फारसे आवडतच नाही. असे जर तुम्हाला सांगितले तर नवल वाटेल ना. पण हो दिल दोस्ती म्हणत सर्वांच्याच घराघरात पोहचलेला अभिनेता  अमेय वाघ याला काही फोटो-बिटो काढण्यात काही जास्त इंटरेस्ट नाही असे त्यानेच सीएनएक्सला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. अमेयने नूकतेच एक झक्कास फोटोशुट केले आहे.

         याबातच त्याने काही गोश्टी सांगितल्या. अमेय म्हणाला, मला अगदी प्रोफेशनली फोटोपोझ वगैरे देता येत नाही. पण माझा मित्र विनायक कुकर्णी हा फोटोग्राफर आहे अन तो बºयाच दिवसापासुन एक फोटोसेशन करु म्हणुन माझ्या मागे लागला होता. शेवटी आम्ही पुणे, टिंबर मार्केट, ट्रॅफीकमध्ये अगदी रस्त्यावर उतरुन देखील फोटोज काढले आहेत. हे फोटोज मी फक्त एक चेंज म्हणुन माझ्या मित्राच्या सांगण्यावरुन केले आहेत. या फोटोंमध्ये तुम्हाला माझा एकदम वेगळा लुक दिसेल. आत्तापर्यंत मी जसा प्रेक्षकांसमोर आलोय त्यापेक्षा डिफरंट म्हणजेच बॉईश लुकमध्ये न दिसता थोडा मॅच्युअर्ड लुक सर्वांना पहायला मिळेल. या फोटोशुटसाठी वसुधा हेरवाडकर यांची स्टाईल आहे तर विनोद सरोदे यांनी माझा मेकअप केलाय. द मॅड सिरिज ही मालिका मला आवडत असल्याने या फोटो सिरिजला आम्ही द मॅड सिरिज असे नाव दिलय. अमेयला जरी फोटो काढायला आवडत नसले तरी त्याच्या या फोटोशुटला मात्र त्याच्या चाहत्यांकडुन लाईक्सवर लाईक्स मिळत आहेत. 

          {{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Exclusive Amey Mad series photoshoot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.