The excitement of excited artists | असा पार पडणार उत्साहपूर्ण कलावंतांचा प्रयोगोत्सव

रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करुन सादर करीत आहोत.. ही अनाउन्समेंट ऐकताच डोळ्यांसमोर येतात वेगवेगळ्या एकांकिका..तसं पाहता वेगवेगळ्या जागी होणाऱ्या एकांकिका स्पर्धा.. म्हणजेच,  युवा महोत्सव, आय. एन. टी., इप्ता, अस्तित्व, उंबरठा, उत्तुंग आणि सवाई अशा कैक स्पर्धा दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात होत असतात... ह्या एकांकिका स्पर्धा मध्ये आपल्याला नेहमीच वेगवेगळ्या विषयावर एकांकिका पहायला मिळतात.. भावनिक, सामाजिक, फँन्टसी, कौटुंबिक असे विषय हाताळण्याच तंत्र चित्रपटा नंतर एकांकिकानी पुरेपुर सांभाळलं.. पण एकूणच ह्या एकांकिका स्पर्धा मध्ये आपल्याला नेहमीच स्पर्धेच वातावरण असत.. एकमेकांवर मात करुन वर्षभरातील सर्वोत्कृष्ट एकांकिका करण्याचा प्रयत्न असतो.पण ह्या स्पर्धेच्या वातावरणातून बाहेर पडून हे प्रयोग बघण्याची मजा वेगळीच असते आणि असं खरच असेल तर?
ना कोणतीही स्पर्धा, ना हार ना जीत.. फक्त एकांकिकाचे प्रयोग.. हेच प्रयोग सादर करण्यासाठी पुढे पाऊल टाकल ते 11hr प्रोडक्शनने. 11th प्रोडक्शन तर्फे हे प्रयोग सादर केले जातात ते "प्रयोगोत्सव... उत्सव कलेचा, उत्साह कलावंतांचा" या महोत्सवातून. प्रयोगोत्सव अर्थात सादर केल्या जाणाऱ्या प्रयोगांचा उत्सव.

11th hour च प्रयोगोत्सव साजरा करण्याच हे दुसरे वर्ष. गेल्या वर्षी प्रत्येकाच्या आठवणींमध्ये राहतील अशा 6 एकांकिका प्रयोगोत्सवात दाखविण्यात आल्या त्यामध्ये दप्तर, श्याम ची आई, ईन सर्च आॅफ, ओवी, विभवांतर या एकांकिकाचा समावेश होता.. याही वर्षी 11th hour प्रोडक्शन प्रेक्षकांच्या भेटीसाठी अशाच एकूण 7 उत्कृष्ट-दर्जेदार कलाकृती घेऊन येत आहेत.. डाॅल्बी, वाजलं कि धडधड.., शुभ यात्रा, पाॅज, निर्वासित, माणूस, मॅट्रिक, साॅरी परांजपे या एकांकिका आपल्याला पहायला मिळणार आहेत.. या सातही एकांकिका वेगवेगळ्या धाटणीच्या असून हा खरोखरच प्रयोगोत्सव साजरा होणार आहे.ह्यातील डाॅल्बी, वाजलं की धडधड ही एकांकिका गावातील एका सुभानराव ह्या उमद्या राजकारणी मुलाच्या लग्नावर आधारीत आहे ज्यामध्ये सामाजिक क्रांतीच्या नावाखाली घडणार वेगळ राजकारण आणि त्याचा दोन्ही कुटुंबावर होणारा परिणाम हे पहायला मिळेल.तर निर्वासित ही एकांकिका मुंबईत गेली कित्येक वर्षे भाड्याने घर घेऊन राहणाऱ्या एका कुटुंबाची आहे जी हळुवारपणे चार भिंतींच आपल्या सोबत असणार नात उलगडते, सोबत घरातल्या प्रत्येक माणसाच्या मनाचा एक दरवाजा उघडून दाखवते.एम. डी कॉलेजची शुभ यात्रा ही मुंबईची ओळख असणाऱ्या लोकल ट्रेनवर व गर्दीशी निगडीत आहे जी किती हि असहनीय असली तरी आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे हे दाखवते.शाळेत पहिल येणार किंवा मॅट्रीक मध्ये पहिल येण हे प्रत्येकाचे स्वप्न असते.. आणि त्यांच्या स्वप्नांना फुंकर घालवण्याच काम हे आई बाबा करतात.मॅट्रीक ही एका गावाकडील मुलीची कहाणी.तिला मॅट्रीक मध्ये पहिल येण्याची इच्छा आणि त्याच वेळी तिच्या आयुष्यात घडलेली घटना आणि ह्या संपूर्ण प्रसंगाला एक "बाप" म्हणून धीटपणे सामोरे गेलेले वडील ही नात्याची वीण एकांकिका मध्ये गुंफलेली आहे.माणसं ह्या एकांकिकेमध्ये, माणूस म्हणून आपली विकासासाठी जाणाऱ्या वाटेवर माणूस म्हणूनच केलेला उध्द्वंस दिसतो. झाड कापताना आपण इतर नैसर्गिक गोष्टींचा किंवा प्राण्यांचा जे त्या झाडांवर किंवा निसर्गावर अवलंबून आहेत ह्याचा विचारच करत नाही अश्या वेळी जर त्या प्राण्यांनी आपल्या विरुध्द बंड केला तर काय होईल हे दाखवल आहे.साॅरी परांजपे ही एकांकिका एका लेखकावर आधारीत आहे. ज्यात काही काॅलेजच्या विद्यार्थांच एक छोट्या गोष्टिवरुन झालेला वाद पुढे एक खरच मोठा वैचारिक मुद्दा ठरतो, ज्यात लेखकाच्या मूळ विचारांचा खरच विचार करुन ते अनुसरण्याची गरज आहे हे ह्या एकांकिकेमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.माणसाच वय जस वाढत जात तस त्याच्या आयुष्यात असा एक टप्पा येतो जिकडे अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत जातात.. वयाच्या चाळीशीचा टप्पा गाठल्यावर एका बाई मध्ये झालेला बदल अश्या वेळी तिला हवी असणारी आपल्या माणसांची सोबत तर दुसऱ्या बाजूला होणारी चिडचिड हा आयुष्यामध्ये वयाच्या टप्प्यानुसार येणारा पाॅज ,ह्या एकांकिकेचा विषय आहे.एकूणच ह्या सगळ्या एकांकिकाचा प्रेक्षकांना वेगळा अनुभव आणि आस्वाद देण्यासाठी स्पर्धेच्या जगातून वेगळ काढण्यासाठी 11th hour ने पुढाकार घेतला जो गेल्या वर्षी म्हणजेच प्रयोगोत्सवच्या पाहिल्या वर्षी प्रेक्षकांचा  तुफान प्रतिसाद मिळाला होता.यंदाही 11th hour प्रोडक्शन येत्या 20 मार्च ला, रविंद्र नाट्य मंदिर येथे सकाळी 10 वाजता हा प्रयोगोत्सव साजरा करणार आहे.. 
Web Title: The excitement of excited artists
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.