Durga Patil will be seen in the film | राजन चित्रपटात झळकणार दुर्गा पाटील

 छोटा राजन याच्या जीवनावर आधारित राजन हा चित्रपटा लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता संतोष जुवेकर झळकणार आहे. तसेच संतोषसोबत या चित्रपटात कोण असणार आहे याची चर्चा बºयाच दिवासांपासून रंगत असल्याची पाहायला मिळत आहे. फायनली या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण या चित्रपटात संतोष जुवेकरसोबत अभिनेत्री दुर्गा पाटील हा नवा चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राजन चित्रपटातील राणी या भूमिकेसाठी दुर्गाची निवड करण्यात आली आहे. २३० मुलींमधून दुर्गाची निवड झाली आहे. अवघ्या १९ वर्षाची ही अभिनेत्री आहे. सध्या एसवायमध्ये शिकत आहे. तसेच रग्बी या खेळात ती  नॅशनल प्लेअरदेखील  आहे. तसेच तिने मार्शल आर्टसमध्ये सुवर्ण पदक ही पटकावलं आहे. जेव्हा दुर्गाची  निवड झाली तेव्हा तिच्या देहबोली आणि भाषाशैली वर विशेष मेहनत घेण्यात आली आहे. चित्रपटातील राणी या भूमिकेसाठी दिग्दर्शक भरत सुनंदा यांना कठोर,प्रेमळ आणि नाजूक अशी मुलगी हवी होती. मात्र खेळाडू असलेल्या दुर्गाला या भूमिकेसाठी तयार करताना ६ महिन्यांचा कालावधी लागला असल्याचे समजत आहे. जेव्हा दुर्गाची निवड झाली तेव्हा तिच्या देहबोली आणि भाषाशैली वर विशेष मेहनत घेण्यात आली आहे.. तसेच ध्येय पूर्ण करण्याची  जिद्द माणसाला कधीतरी चुकीच्या मार्गावर घेऊन जाते आणि आयुष्यात कशा प्रकारचे बदल होतात असे काहीसे कथानक या चित्रपटाचे असणार आहे. चित्रपटाचे निमार्ते दर्शना भडांगे असून सह-निमार्ते दीप्ती श्रीपत आहेत.दिग्दर्शक भरत सुनंदा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रिधम मुव्ही प्रेजेंटसोबत मुदिता फिल्म्स प्रस्तुत राजन हा चित्रपट आहे.  
Web Title: Durga Patil will be seen in the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.