The duo of Bhushan Pradhan and Pallavi Patil will be seen in the film 'Thou Are There' | ​‘तू तिथे असावे’ चित्रपटात झळकणार भुषण प्रधान आणि पल्लवी पाटीलची जोडी

वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट लक्षवेधी ठरले आहेत. अशीच एक हटके जोडी तू तिथे असावे या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता भुषण प्रधान आणि अभिनेत्री पल्लवी पाटील हे दोघे तू तिथे असावे या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. नात्यांची सुरेख सांगड घालत प्रेमाचा, विश्वासाचा, जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा तू तिथे असावे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जी कुमार पाटील एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील आणि दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.  
जगण्याची प्रेरणा देणारा तू तिथे असावे हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा विश्वास निर्माता आणि दिग्दर्शकांनी यावेळी व्यक्त केला. आयुष्यात कधी कोणत्या अडथळ्यांना आपल्याला सामोरे जावे लागेल हे सांगता येत नाही. अशावेळी हताश न होता आयुष्य कसे जगावे यावर भाष्य करणारा तू तिथे असावे हा एका वेगळ्या विषयाचा चित्रपट आहे. भुषण प्रधान, पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, सुनील तावडे, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा आशिष-दिपक यांची आहे. संगीत दिनेश अर्जुना तर छायांकन बाशालाल सय्यद यांचे आहे. चित्रपटाचे सहनिर्माते आकाश कांडूरवार, प्रशांत ढोमणे, शरद अनिल शर्मा असून कार्यकारी निर्माते रोहीतोष सरदारे आहेत.
भुषण प्रधानने घे भरारी या त्याच्या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. संस्कृती या मालिकेतील त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेमुळे भुषणाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. मालिकेशिवाय सतरंगी रे, टाईमपास, कॉफी आणि बरंच काही, टाइम बरा वाईट यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 
पल्लवी आणि भुषण यांची जोडी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी तू तिथे असावे या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे. 

Also Read : भुषण प्रधानची व्यायामाची नवी स्टाइल तुम्ही पाहिलीत का?

Web Title: The duo of Bhushan Pradhan and Pallavi Patil will be seen in the film 'Thou Are There'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.