Due to this reason, this 'photo of Mansi Naik' will be discussed? | या कारणामुळे मानसी नाईकच्या 'या' फोटोची होतेय चर्चा?

आपला डान्स आणि अदांनी मानसीनं मराठी रसिकांच्या मनावर मोहिनी घातली आहे. त्यामुळेच ती रसिकांची एक लाडकी अभिनेत्री आहे.रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी मानसी आपलं शंभर टक्के योगदान देत असते. तिच्या डान्स कौशल्यासोबतच तिच्या मादक अदा आणि ग्लॅमरस लूकच्याही तितक्याच चर्चा होतात.मानसीनं आपली फॅशन स्टाईल जपली आहे.कायमच आपल्या फॅशन स्टेटमेंटने ती रसिकांवर जादू करत असते. आता पुन्हा एकदा मानसीनं रसिकांवर जादू केली आहे. यावेळी तिनं आपल्या डान्सनं नाही तर आपल्या खास लूकनं रसिकांना आकर्षित केलं आहे.मानसीने नुकताच तिच्या इन्सटाग्रामवर तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. त्यात तिने सोनेरी रंगाची बिकीनी घातलेली आहे.फोटोमध्ये मानसी फार ग्लॅमरस दिसत आहे.या लूकमध्ये मानसीचं सौंदर्य आणखी खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.त्यामुळे तिने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करताच अवघ्या काही क्षणात त्याला लाईक आणि कमेंट्स येऊ लागल्या. फॅन्सला मानसीचा हा ग्लॅमरस लूक भलताच भावला आहे. मानसीचा  ब्युटी इन गोल्ड अंदाज कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.या फोटोशूटमध्ये मानसीची विविध छबी पाहायला मिळत आहेत. या फोटोशूटमध्ये मानसीची प्रत्येक छबी विशेष आणि तितकीच हटके आहे.  मानसीचे बघतोय रिक्षावाल या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या'हे गाणे तुफान हिट ठरले.मानसीच्या प्रत्येक गाण्याने तर पार्टी असो या लग्न हे गाणे धुमाकूळ घालताना पाहायला मिळते. तिचे बघतोय रिक्षावाला या गाण्याची रसिक आजही आनंद लुटताना दिसतात. 


Also Read:मानसी नाईकची झक्कास राइड

प्रत्येकाची इच्छा असते की, आपल्या आयुष्यात एकदा तरी आपण विमान, हेलिकॉप्टरची राइड घ्यावी. एकदा तरी आपण हवेत उडावे असे स्वप्न मनाशी ठेवून प्रत्येकजण जगत असतो. कलाकारांच्या बाबतीत हे स्वप्न साहजिकच पूर्ण होतात. अशी एक हवेतील राइड प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मानसी नाईक हिने एन्जॉय केली असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Web Title: Due to this reason, this 'photo of Mansi Naik' will be discussed?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.