मोरूची मावशी फेम विजय चव्हाण यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2017 06:45 AM2017-02-08T06:45:11+5:302017-02-08T12:24:21+5:30

विजय चव्हाण त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले ...

Do you know about Vijay Chavan? | मोरूची मावशी फेम विजय चव्हाण यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

मोरूची मावशी फेम विजय चव्हाण यांच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

जय चव्हाण त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी अतिशय ताकदीने स्त्री पात्र रंगवलेले होते. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही गोष्टीः

विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत लहानाचे मोठे झाले.

vijay chavan

विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत.

vijay chavan

विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकेमध्ये भाग घेणारा स्पर्धक ऐनवेळी काही कारणास्तव येऊ शकला नव्हता. पण त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असायचे. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्याप्रकारे सादर करू शकतील असा विजय कदम यांना विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. 

vijay chavan

मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरे तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत यांना विचारण्यात आले होते. पण हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते. त्यांनीच या भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य असल्याचे निर्मात्यांना सांगितले होते.

vijay chavan

विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350-400 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

vijay chavan


1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.

vijay chavan
विजय चव्हाण आणि त्यांचा मुलगा वरद चव्हाण या दोघांचाही वाढदिवस 8 फेब्रुवारीलाच असतो. वरदने ऑन ड्युटी 24 तास, धनगरवाडा यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. तो सध्या 100 डेज या मालिकेत काम करत आहे.

varad chavan


गेल्या काही महिन्यांपूर्वी विजय चव्हाण यांची तब्येत ढासळली होती. पण आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना लवकरच अनुभवायला मिळणार आहे. विजय चव्हाण यांचे हलाल, काव काव कावळे, ए ढिश्शूम यांसारखे अनेक चित्रपट पुढील काळात प्रदर्शित होणार आहेत. 
 

Web Title: Do you know about Vijay Chavan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.