On display of Motion poster of 'One More' movie on Akshay Tritiya's auspicious occasion | अक्षय तृतीयाच्या शुभमूहुर्तावर ‘Once मोअर’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात अलीकडच्या काळात खूप विविधता दिसून येत आहे.प्रेक्षकवर्गाकडूनही वेगळ्या पठडीतल्या सिनेमांचे चांगलं स्वागत होत आहे. वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Once मोअर’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.सोशल साईट्सवर या पोस्टरला चांगला प्रतिसाद मिळतोय.

एखादी गोष्ट आवडल्यानंतर त्याला ‘वन्स मोअर’ची दाद हमखास मिळते.पण ‘Once मोअर’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये एका व्यक्तीचा शोध दिसून येतोय. या शोध घेणाऱ्या व्यक्तिरेखेमुळे या चित्रपटात नक्की काय असावे याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली आहे. 'चित्रपटाचे मोशन पोस्टर पाहिल्यानंतर या चित्रपटात ‘कुछ हटके’ आहे असे तुम्हाला वाटेल. हा शोध नेमका कशाचा आहे? शोध घेणारी ती व्यक्ती कोण? या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात आहेत. या चित्रपटातून कोणता विषय हाताळण्यात येणार आहे ? या सगळ्या गोष्टींवरून लवकरच पडदा उठणार आहे. या चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले असून दिग्दर्शन नरेश बिडकर यांचे आहे.धनश्री विनोद पाटील, देवस्व प्रोडक्शन या चित्रपटाचे निर्माते आहेत.विष्णू मनोहर, निलेश लवंदे, अभय ठाकूर सहनिर्माते आहेत.या चित्रपटाच्या निमित्ताने शेफ विष्णू मनोहर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतायेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी संजय सिंग यांनी सांभाळली आहे.

'Once मोअर' सिनेमासोबतच आणखीन एका चित्रपटाचा पोस्टर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लॉन्च करण्यात आले आहे.अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर बऱ्याचशा शुभ गोष्टी होताना आपल्याला दिसतात.याच दिवसाचं औचित्य साधून वर्षाच्या सुरूवातीलाच मुहूर्त झालेल्या 'बोनस' या चित्रपटाचं टीझर पोस्टर सोशल मिडियावरून नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.या पोस्टरवर उच्चभ्रू जीवनशैली असणारा एक तरूण एका साधारणशा खोलीत आपलं आयुष्य व्यतित करण्याच्या उद्देशाने पुढे सरसावला आहे.या तरूणाभोवती फिरणारी ही कथा... याचं बोनसशी काय नातं आहे? हे चित्रपट पाहिल्यावर आपल्याला कळणार आहे.या चित्रपटात गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.'बोनस' या संवेदनेभोवती फिरणारी ही कथा सौरभ भावे यांनी लिहिली आहे.तर दिग्दर्शनाची धुरा ही सौरभ भावे यांनीच सांभाळली आहे.या चित्रपटाला साजेसं संगीत रोहन – रोहनने दिले आहे.या चित्रपटाची निर्मिती लायन क्राऊन एंटरटेनमेंट यांनी केली असून गोविंद उभे,रतिश पाटील, संदेश पाटील आणि एम. अनुपमा या चित्रपटाचे निर्माते आहेत.         
Web Title: On display of Motion poster of 'One More' movie on Akshay Tritiya's auspicious occasion
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.