Did you watch this video of Swapnil Joshi and his cute girl? | ​स्वप्निल जोशी आणि त्याची गोंडस मुलगी मायराचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?
​स्वप्निल जोशी आणि त्याची गोंडस मुलगी मायराचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?
स्वप्निलने आपल्या हटके अभिनय शैलीने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळेच प्रेक्षक त्याला महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणून संबोधतात. स्वप्निल आणि लिना १६ डिसेंबर २०११ ला लग्नाच्या बंधनात अडकले होते. लिना ही व्यवसायाने डेन्टिस्ट असून, ती मूळची औरंगाबाद येथील आहे. या दाम्पत्याला मायरा नावाची मुलगी असून ती आता दोन वर्षाची झाली आहे. मायरा आणि स्वप्निलचा एक क्यूट व्हिडिओ स्वप्निलने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला असून या व्हिडिओला स्वप्निलच्या चाहत्यांची भरभरून पसंती मिळत आहे.
स्वप्निल आणि मुक्ता बर्वे यांची मुख्य भूमिका असलेल्या मुंबई पुणे मुंबई या चित्रपटाला नुकतेच आठ वर्षं झाले. त्यामुळे स्वप्निलने या चित्रपटाची आठवण करून देत या चित्रपटातील एक गाणे त्याची लाडकी लेक मायरा सोबत गायले आहेत. मायराच्या बोबड्या बोलातून हे गाणे ऐकण्याचा अनुभव खूपच छान आहे. हा व्हिडिओ केवळ काहीच तासांत अनेक हजाराहून लोकांनी पाहिलेला आहे. तसेच बाप-लेकीची जोडी प्रेक्षकांना खूपच भावत असल्याचे त्यांनी प्रतिक्रियांमधून सांगितले आहे. 
स्वप्निलने ‘उत्तर रामायण’ या मालिकेतून वयाच्या नवव्या वर्षी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘कृष्णा’ या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना त्याकाळी प्रचंड पसंतीस आली होती. पुढे ‘हद कर दी आपने’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘देस में निकला होगा चाँद’, ‘अमानत’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘गुलाम-ए-मुस्तफा’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे तर सर्वत्र कौतुक झाले होते. ‘कॉमेडी सर्कस’ या कार्यक्र मात स्वप्नीलचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांना बघावयास मिळाला. या कार्यक्र मातील त्याच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यामुळेच स्वप्नीलला आज मराठीतील सुपरस्टार असेही संबोधले जाते. मराठीतील ‘दुनियादारी’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘भिकारी’ यांसारखे अनेक हिट चित्रपट त्याने दिले आहेत. ‘मुंबई-पुणे-मुंबई-३’ हा त्याचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.





Also Read : ​स्वप्निल जोशीच्या मुलाचे फोटो तुम्ही पाहिलेत का?
Web Title: Did you watch this video of Swapnil Joshi and his cute girl?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.