Did you watch this special selfie kishori shankeena with 'Bollywood Queen' Kangana Ranaut? | 'बॉलिवूड क्वीन' कंगना राणौतसह किशोरी शहाणेंचा हा खास सेल्फी तुम्ही पाहिला का?

प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा एक सेल्फी समोर आला आहे. या सेल्फीची खास बात म्हणजे यांत किशोरी शहाणे यांच्यासोबत बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत पाहायला मिळत आहे. कंगणाची प्रमुख भूमिका असलेला सिमरन हा सिनेमा नुकताच रसिकांच्या भेटीला आला आहे.या सिनेमात कंगनानं गुजराती मुलीची वेगळी अशी भूमिका साकारली आहे. त्यामुळे या सिनेमाची रसिकांमध्ये उत्सुकता होती.या सिनेमात कंगणासह मराठमोळ्या अभिनेत्री किशोरी शहाणे यांचीही विशेष भूमिका आहे. या सिनेमात अभिनेत्री कंगना राणौत हिच्या आईची भूमिका यांनी साकारली आहे.त्यांनी साकारलेली आईची भूमिका विशेष आणि महत्त्वाची आहे. ही आई आपल्या लेकीबाबत खूप काळजी करणारी असते.या भूमिकेला विविध शेड्स आहेत. सिनेमाच्या सुरुवातीपासूनच किशोरी शहाणे आणि कंगना यांच्यात वेगळंच नातं निर्माण झालं होतं. ज्यावेळी किशोरी शहाणे या कंगणाला भेटल्या त्यावेळी त्यांना पाहून ती म्हणाली की,“इन्हें मेरी मॉम मत बनाओ, कितनी सुंदर और फिट है किशोरीजी”. कंगनाच्या मनाचा मोठेपणा पाहून किशोरी शहाणे याही भारावून गेल्या होत्या.तेव्हापासून शूटिंगच्या सेटवर दोघींमध्ये चांगलं मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. त्या बाँडिंगचा फायदा त्यांना सिनेमात आई आणि लेकीची भूमिका साकारतानाही झाला. सिनेमात माय लेकी साकारताना दोघींमध्ये विशेष नातं निर्माण झालं. त्याचीच झलक कंगणा आणि किशोरी शहाणे यांच्या या सेल्फीमध्ये पाहायला मिळत आहे. 
 
Also Read: निष्ठावान रसिक मिळायला भाग्य लागतं – किशोरी शहाणे

'जाडू बाई जोरात' या मालिकेच्या निमित्ताने जवळपास दहा ते बारा वर्षांनंतर किशोरी शहाणे विनोदी भूमिका साकारत आहे.किशोरी यांना विनोदी भूमिका साकारायला आवडतात.त्यामुळे आवडीचं करायला मिळत असल्याने  खूप एक्साईटेड असल्याचे सांगतात.मुळात जेव्हा या मालिकेची ऑफर मिळाली आणि स्क्रीप्ट वाचली तेव्हाच ती भावली.यातील माझी व्यक्तीरेखा गंमतीशीर, मजेशीर आणि वेगळी आहे.सर्वसामान्यांना आपल्या घरात पाहायला आवडेल अशी हलकीफुलकी कथा या मालिकेची आहे. या मालिकेत निर्मिती सावंत माझी बालमैत्रिण दाखवली आहे.निर्मितीला तिच्या लेकीचं लग्न माझ्या मुलाशी करण्याची इच्छा आहे. त्यातूनच सगळी तू-तू-मैं-मैं अशा मजेशीर गोष्टी रसिकांना जाडू बाई जोरात या मालिकेतून पाहायला मिळणार असल्याचे किशोरी यांनी सांगितले.
 
Web Title: Did you watch this special selfie kishori shankeena with 'Bollywood Queen' Kangana Ranaut?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.