Did you watch the movie trailer of Mascara, who played the lead role of Chinmay Mandlekar, Aniket Biswasrova and Prayer Behere? | चिन्मय मांडलेकर, अनिकेत विश्वासराव आणि प्रार्थना बेहेरे यांची मुख्य भूमिका असलेल्या मस्का या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

धमाल विनोदासह सस्पेन्स आणि थ्रिलरचा तडका असलेल्या अमोल जोशी प्रोडक्शन्स आणि स्वरूप रिक्रिएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित आगामी ‘मस्का’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात पार पडला.
अभिनेता, नाट्य दिग्दर्शक अशी ओळख असलेला प्रियदर्शन जाधव ‘मस्का’ मधून चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. या सोहळ्याला अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासराव, चिन्मय मांडलेकर, प्रणव रावराणे, शशांक शेंडे आणि विद्याधर जोशी, संगीतकार चिनार आणि महेश, गायक महालक्ष्मी अय्यर, अवधूत गुप्ते, गणेश चंदनशिवे, गीतकार मंगेश कांगणे, व्हिडीओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी, निर्माते प्रशांत पाटील, प्रस्तुतकर्ते सचिन नारकर, विकास पवार, आकाश पेंढारकर, विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
‘मस्का’ चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अनिकेत विश्वासराव हा काहीसा हतबल दिसत असून शशांक शेंडे हे कधी चिंतीत तर कधी नाट्यमय प्रसंगात दिसत आहेत, तर प्रणव रावराणे हा एका स्पेशल चाईल्ड असल्याचे दिसतेय. चिन्मय मांडलेकर या चित्रपटात पहिल्यांदाच विनोदी शैलीत दिसणार आहे. आजवर अनेक चित्रपटातून सोज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रथमच हटके अशा बोल्ड अंदाज मध्ये पडद्यावर आपल्याला बघायला मिळणार आहे. तिचा हा हटके अंदाज सर्वांनाच भुरळ पाडतोय.
चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर उत्तम प्रतिसाद मिळाला असून ‘मस्का’ चित्रपटातील गाणी देखील अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. गणेश चंदनशिवे यांनी गायलेले ‘बया’ गाणे तरुणाईने चांगलेच डोक्यावर घेतले आहे तर ‘चला पटकन पकडा पोकेमॉन’ या गाण्याचीही तरुणाईला भुरळ पडल्याचे दिसतेय. 
मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित, अमोल जोशी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप रिक्रिएशन्स अँड मीडिया प्रा. ली. प्रस्तुत ‘मस्का’चे प्रशांत पुरुषोत्तम पाटील निर्माते आहेत तर प्रस्तुतकर्ता सायली जोशी,सचिन नारकर, विकास पवार आणि सह प्रस्तुतकर्ता आकाश पेंढारकर आणि विनोद सातव आहेत. अत्यंत हटके विषयावरील सस्पेन्स, थ्रीलर आणि कॉमेडी असा मनोरंजनाचा फुल टू तडका असलेला ‘मस्का’ हा चित्रपट येत्या १ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.Also Read : प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला झाला भीषण अपघात, प्रार्थनाला झाली गंभीर दुखापत
Web Title: Did you watch the movie trailer of Mascara, who played the lead role of Chinmay Mandlekar, Aniket Biswasrova and Prayer Behere?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.