रिमा लागू यांच्या होम स्वीट होम या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 11:46 AM2018-09-12T11:46:06+5:302018-09-13T06:00:00+5:30

घर हे केवळ चार भिंती आणि दोन खिडक्यांपर्यंत मर्यादित न राहता कुटुंबाचे सदस्य बनण्याची क्षमता असणारी वास्तू आहे, असे होम स्वीट होम या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वैभव जोशी यांची कविता सांगून जाते.

Did you watch the last movie trailer of Rima Aap's Home Sweet Home? | रिमा लागू यांच्या होम स्वीट होम या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

रिमा लागू यांच्या होम स्वीट होम या शेवटच्या चित्रपटाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का?

googlenewsNext

घर ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मोहक आणि आपलीशी संकल्पना आहे. घराचा आणि त्याच्याशी निगडीत नातेसंबंधांचा प्रवास अतिशय अनोख्या पद्धतीने विषद करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात सर्व कलाकारांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडला.

फ्रेम्स प्रॉडक्शन्स कंपनी प्रा. लि. निर्मित आणि प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून लेखक, अभिनेता अशी ओळख असलेला हृषिकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.  

घर हे केवळ चार भिंती आणि दोन खिडक्यांपर्यंत मर्यादित न राहता कुटुंबाचे सदस्य बनण्याची क्षमता असणारी वास्तू आहे, असे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वैभव जोशी यांची कविता सांगून जाते. तसेच रीमा आणि मोहन जोशी या दाम्पत्यामधील निखळ आणि विनोदी किस्से मनाला भावतात. शहराच्या मध्यवर्ती भागात असललेल्या घराच्या विक्रीतून मोठी रक्कम मिळेल हे कळताच रीमा यांची उतारवयात सर्वसुख सुविधायुक्त अशा उच्चभ्रू इमारतीतील घर घेण्याची इच्छा होते; पण घराविषयी जिव्हाळा बाळगणारे मोहन जोशी घर विकण्यास तयार नाहीत. स्पृहा जोशी साकारात असलेली अवखळ देविका आणि हृषिकेश जोशी यांचा साधा, मध्यमवर्गीय सोपान सुद्धा मनाला भावणारा आहे. शिवाय या ट्रेलरमध्ये विभावरी देशपांडे, प्रसाद ओक, सुमित राघवन आणि मृणाल कुलकर्णी यांची झलक दिसते, यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण होते.

 

‘होम स्वीट होम’ची कथा हृषिकेश जोशी, वैभव जोशी, मुग्धा गोडबोले यांची आहे. अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘इकडून तिकडे तिकडून तिकडे’ हे गीत सध्या लक्ष वेधून घेत आहे तर सचिन पिळगांवकर यांच्या आवाजत 'हाय काय नाय काय' ऐकायला मज्जा येतेय. या चित्रपटाचे निर्माते हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर आहेत तर आकाश पेंढारकर, विनोद सातव या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

घराविषयीची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असली तरी घर हे प्रत्येकाला हवं असतं आणि सर्वांचं आपलं घर हे ‘होम स्वीट होम’ असतं, असं सांगणारा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Did you watch the last movie trailer of Rima Aap's Home Sweet Home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.