Did you watch the childhood film of Fame Siddhi Factories? | लव्ह लग्न लोचा फेम सिद्धी कारखानीसचा लहानपणीचा फोटो तुम्ही पाहिला का?

सिद्धी कारखानीसने माझा होशील का या मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेत तिने रुतुजा सरपोतदार ही भूमिका साकारली होती. त्यानंतर ती देवयानी या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. सध्या ती झी युवावरील लव्ह लग्न लोचा या मालिकेत काम करत असून तिची शाल्मली ही भूमिका चांगलीच गाजत आहे. या मालिकेला जवळजवळ वर्षं झाले असून तिच्या या भूमिकेचे सगळेच कौतुक करत आहेत. 

sidhi karkhanis

सिद्धी कारखानीसला चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग आहे. ती नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहात असते. ती तिचे विविध फोटो, व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने तिचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोला तिच्या चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. सिद्धीने तिच्या लहानपणीचा आणि तिचा आताचा असे दोन फोटो फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केले आहेत. त्यासोबत माझा लहानपणीचा फोटो आणि आताची मी असे तिने लिहिले आहे. त्याचसोबत सिद्धी कारखानीस व्हर्सेस शाल्मली, तुम्हाला मी कशी वाटतेय असे देखील तिने तिच्या चाहत्यांना विचारले आहे. तिने हा फोटो पोस्ट केल्यापासून अनेकांनी हा फोटो लाइक केला आहे. तसेच ती तिच्या लहानपणीच्या फोटोमध्ये खूपच छान दिसत आहे असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. तू या फोटोत एखाद्या बार्बी डॉलप्रमाणे दिसत आहेस अशी देखील तिच्या चाहत्यांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.  

Also Read : सिद्धी म्हणतेय... कुछ ना कहो
Web Title: Did you watch the childhood film of Fame Siddhi Factories?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.