Did you see the pictures of Sonali Kulkarni's holiday? | सोनाली कुलकर्णीचे हॉलिडेचे फोटो तुम्ही पाहिले का?

सध्या सुट्टी असल्यामुळे प्रत्येकजण वेळात वेळ काढून आपल्या कुटुंबियांसोबत हॉलिडेला जात आहे. अनेक कलाकार देखील आपल्या व्यग्र शेड्युलमधून आपल्या कुटुंबियांसाठी वेळ काढताना दिसत आहेत. सोनाली कुलकर्णीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत तिच्यासोबत तिचे संपूर्ण कुटुंब पाहायला मिळत आहे. सोनाली नुकतीच जंगल सफारीला गेली होती. तिथले काही फोटो तिने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहेत. तिला जंगलात कोणकोणते प्राणी पाहायला मिळाले हे तिने फोटोंद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. त्यासोबतच तिने कॅप्शन लिहिले आहे. सोनालीने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मी नुकतीच जंगल सफारी केली. सफारी करताना त्यांनी सांगितलेले सगळे नियम तंतोतत पाळले. आम्हाला वाघ पाहाण्याची इच्छा होती. पण वाघ काही आम्हाला दिसला नाही. पण जंगलातील प्राणी आणि त्यांचे आयुष्य पाहून आम्ही खूप खूश झालो. मी तिथे राहू शकते असे मला आता वाटायला लागले आहे. सोनालीने शेअर केलेल्या फोटोत आपल्याला तिचे पती नचिकेत आणि तिची मुलगी पाहायला मिळत आहे. 
टॅलेंटेड अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने दिल चाहता है, मिशन कश्मीर, प्यार तुने क्या किया, डरना जरूरी है, टॅक्सी नं 9211 यासारख्या हिंदी सिनेमांत अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत. एक अभिनेत्री म्हणून तिने मराठी, कन्नड, गुजराती आणि तमिळ सिनेमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्याशिवाय नाटकांच्या माध्यमातून रंगमंचावरही ती सक्रीय आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे. मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे. चाळीशीत असलेल्या सोनालीने उत्तम फिगर मेन्टेन केली आहे. तिच्या या फिटनेसचे एक खास आणि विशेष कारण आहे. सोनालीला सायकलिंगची आवड आहे. ती उत्तम सायकलिस्ट आणि रनर आहे हे फार कमी जणांना माहिती आहे. ती नेहमी खारपासून वर्सोवा किंवा बांद्रापर्यत सायकलिंग करत असते. आपल्या सायकलिंगपासून इतरांनीही प्रेरणा घ्यावी आणि फिट राहावे यासाठी स्वतःचे सायकलिंग आणि रनिंग करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

Also Read : मुंबईच्या वाहतूक कोंडीचा सोनालीला बसला फटका,मात्र ‘त्या’च्यामुळे सोनालीची झाली ‘सोकुल’ सुटका
Web Title: Did you see the pictures of Sonali Kulkarni's holiday?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.