Did Ajay see his first poster of the movie? | ​अजय देवगणच्या आपला मानूसचे पहिले पोस्टर पाहिले का?

बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून त्याच्या चित्रपटाचे नाव त्याने नुकतेच घोषित केले आहे. त्याच्या या चित्रपटाचे नाव आपला मानूस असून या चित्रपटात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहे. अजयने या चित्रपटाची घोषणा केल्यापासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाचे पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीस आले असून हे पोस्टर अजय देवगणनेच सोशल मीडियावर लाँच केले आहे. 
अजय देवगणने या चित्रपटाचे पोस्टर ट्वीट करत एक कॅप्शन लिहिली आहे. या कॅप्शनमध्ये त्याने म्हटले आहे की, हे पाहा आपला मानूस या चित्रपटाचे पहिले पोस्टर. हे पोस्टर पाहून चित्रपटाचा अंदाज नक्कीच येत आहे. या चित्रपटात नाना पाटेकर बाईकवर बसलेला असून तो प्रचंड पावसात बाईक चालवताना दिसत आहे. नाना पाटेकरचा एक वेगळाच लूक या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. या पोस्टमध्ये हा सैतान बाटलीत मावनारा नाय असे एक वाक्य लिहिले आहे हे वाक्य प्रेक्षकांचे नक्कीच कुतूहल वाढवत आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. अजयच्या ट्वीटला अनेकांनी रिट्वीट केले असून अनेकांनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
आपला मानूस या चित्रपटाचे दिग्दर्शन सतिश राजवाडे यांनी केले असून अजय देवगणसोबतच नाना पाटेकर देखील या चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
अजय देवगण मराठी चित्रपटाची निर्मिती करणार याविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने त्याच्या फॅन्सना सांगितले होते. एका व्हिडिओच्या माध्यमातून अजयने ही माहिती दिली होती. हा व्हिडिओ समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केला होता. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले होते की, ''अजय देवगणने आपला पहिला मराठी चित्रपट आपला माणूस या चित्रपटाच्या निर्मितीचे संकेत दिले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे करणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, सुमीत राघवन, आणि इरावती हर्षे हे कलाकार दिसणार आहेत. हा चित्रपट ९ फेब्रुवारीला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.'' या व्हिडिओसोबत अजय देवगणने आपले महाराष्ट्राच्या मातीशी असलेले नाते ही सांगितले होते.  

Also Read : अजय देवगण या मालिकेद्वारे करणार छोट्या पडद्यावर पदार्पण
Web Title: Did Ajay see his first poster of the movie?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.