अभिमानास्पद! झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर हॉलीवुडपट,मराठमोळा अजिंक्य देव आणि मिलिंद गुणाजी साकारणार या ऐतिहासिक भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 05:21 AM2017-11-18T05:21:48+5:302017-11-18T10:57:22+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावरील सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत या सिनेमात भूमिका साकारणार ...

Congratulations! Historical role of Hollywood, Marathlon, Ajinkya Dev and Milind Gunaji to fulfill the life of Queen Laxmibai of Jhansi? | अभिमानास्पद! झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर हॉलीवुडपट,मराठमोळा अजिंक्य देव आणि मिलिंद गुणाजी साकारणार या ऐतिहासिक भूमिका?

अभिमानास्पद! झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर हॉलीवुडपट,मराठमोळा अजिंक्य देव आणि मिलिंद गुणाजी साकारणार या ऐतिहासिक भूमिका?

googlenewsNext

/>हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या जीवनावरील सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे.बॉलिवूडची क्वीन कंगणा राणौत या सिनेमात भूमिका साकारणार असून 'मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी' असं या सिनेमाचं नाव आहे. कंगणाची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाची सध्या शूटिंग सुरु असताना राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आता हॉलीवुडमध्येही एक सिनेमा साकारला जाणार आहे. 'स्वॉर्ड्स अँड सेप्टर्स' असं या सिनेमाचं नाव आहे. स्वाती भिसे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. स्वाती भिसे यांची मुलगी देविका भिसे या सिनेमात राणी लक्ष्मीबाईंची मध्यवर्ती भूमिका साकारणार आहेत. यांत हॉलीवुड कलाकार झळकणार असले तरी भारतीय कलाकारांचीही या सिनेमात वर्णी लागली आहे. मराठमोळा अभिनेता अजिंक्य देव आणि मिलिंद गुणाजी हे कलाकार या सिनेमात झळकणार आहेत. अजिंक्य देव या सिनेमात तात्या टोपे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता मिलिंद गुणाजी हे झाशीचे महाराज गंगाधर राव यांची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय या सिनेमात नागेश भोसले, यतीन कार्येकर, आरिफ झकारिया या भारतीय कलाकारांनाही संधी मिळाली आहे. डेरेक जॅकोबी, नॅथानियल पारकर, रुपर्ट इवरेट या ब्रिटीश कलाकारांचीही या सिनेमात भूमिका असणार आहे. हॉलीवुडची अभिनेत्री जोधी मे ही राणी व्हिक्टोरीयाच्या भूमिकेत झळकणार आहे. सुरुवातीला या सिनेमाचं शूटिंग जयपूर आणि जोधपूरमध्ये पार पडणार आहे. जवळपास आठ आठवडे या सिनेमाचं शूटिंग जयपूर-जोधपूरमध्ये होईल आणि त्यानंतर लंडन तसंच मोरक्कोमध्येही सिनेमाच्या काही भागाच्या शूटिंगची योजना आहे. 2018 या वर्षात झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावरील हा हॉलीवुडपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या हॉलीवुडच्या सिनेमात अजिंक्य देव, मिलिंद गुणाजी यांच्यासह इतर भारतीय कलाकारांची निवड होणं ही नक्कीच अभिमानास्पद बाब म्हणावी लागेल.

cnxoldfiles/a>देखील झळकणार आहे. अनेक मराठी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रींना हिंदी मालिका, चित्रपटात काम करण्याची संधी अनेकवेळा मिळते.पण पल्लवीला थेट हॉलिवूडची लॉटरी लागली आहे. स्वोर्ड्स अँड स्केपट्रेस या चित्रपटात प्रेक्षकांना पल्लवीदेखी महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यापूर्वी  पल्लवी  'रुंजी' मालिकेत मुख्यभूमिकेत झळकली होती.

Web Title: Congratulations! Historical role of Hollywood, Marathlon, Ajinkya Dev and Milind Gunaji to fulfill the life of Queen Laxmibai of Jhansi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.