Congratulation: The famous actress of Marathi cinema has done a wedding with the actor, the photo she got in front of | Congratulation:मराठी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने या अभिनेत्यासह केले लग्न,समोर आले फोटो

कुणी आपला जोडीदार स्वतः निवडत लव्ह मॅरेज करणे पसंत केले आहे. तर काहींनी आपल्या आईवडिल तसेच कुटुंबीयांच्या पसंतीला सकारात्मक होकार देत लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. 2017च्या वर्षअखेरीस मराठी टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार विवाबंधनात अडकल्याचे पाहायला मिळाले.‘आया मौसम लग्नाचा’ अशीच काहीशी परिस्थिती त्यावेळी पाहायला मिळाली होती.आता अशीच काहीशी खुश खबर आणखीन एका अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना दिली आहे. कारण 'राजवाडे अॅण्ड सन्स' फेम अभिनेत्री कृतिका देव विवाहबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड आणि अभिनेता अभिषेक देशमुखसोबत कृतिकाने रजिस्ट मॅरेज केले आहे. लग्नाचा जास्त गाजावाज न करता मोजक्याच नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. लग्न 6 जानेवारी रोजी पार पडले आहे पण कृतिका आणि अभिषेकने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाची माहिती दिली आहे.नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय. या फोटोंमध्ये नववधू कृतिकाचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. कृतिकाने 'राजवाडे अॅण्ड सन्स', 'हॅपी जर्नी' आणि 'हवाईजादा' यांसारख्या  सिनेमात काम केले असून 'प्रेम हे'मालिकेच्या सिरीजमध्ये या प्रथमेश परबसोबत काम होते केले.यात त्या दोघांची लहानवयात असणारी प्रेमकथा दाखवण्यात आली होती.तसेच अभिषेकही व्यवसायाने अभिनेता,दिग्दर्शक तसेच लेखकही म्हणून काम करतो.अभिषेकने 'पसंत आहे मुलगी' या मालिकेत पुनर्वसूची भूमिका साकारली होती.
मराठी चित्रपटसृष्टीत मनवा नाईक, क्रांती रेडकर, मृण्मयी देशपांडे, श्रृती मराठे, अक्षया गुरव, पल्लवी पाटील लग्नाच्या बंधनात अडकेल आहेत.अनेक सेलिब्रेटींनी 2017 वर्षात विवाहबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवी सुरूवात केली.त्यामुळे आता 2018 वर्षात कोणते चेहरे विवाहबंधनात अडकतात हे पाहणे रंजक ठरणार आहे. काहींनी साखरपुडा करत 2018चा मुहुुर्तात लग्न करणार असल्याचेही म्हटेल आहे.त्यामुळे 2018मध्ये कृतिका आणि अभिषेक पाठोपाठ आणखीन कोणते अभिनेता अभिनेत्री  बोहल्यावर चढणार याचीच उत्सुकता चाहत्यांनाही असणार हे मात्र नक्की.
Web Title: Congratulation: The famous actress of Marathi cinema has done a wedding with the actor, the photo she got in front of
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.