चिन्मय मांडलेकरच्या परफ्युम चित्रपटाचे पोस्टर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 06:30 AM2018-12-17T06:30:00+5:302018-12-17T06:30:03+5:30

परफ्युम असं सुवासिक नाव असलेल्या चित्रपटातून वेगळीच प्रेमकहाणी १ मार्चला प्रेक्षकांपुढे येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाँच करण्यात आले.

Chinmay Mandlekar's perfume movie's poster launched | चिन्मय मांडलेकरच्या परफ्युम चित्रपटाचे पोस्टर लाँच

चिन्मय मांडलेकरच्या परफ्युम चित्रपटाचे पोस्टर लाँच

googlenewsNext
ठळक मुद्देओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल परफ्युम या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये असून पोस्टरवरून ही सस्पेन्स-थ्रिलर प्रकारची प्रेमकहाणी असल्याचं दिसत आहे. तसेच अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे, शिल्पा ठाकरे, हिना पांचाळ असे उत्तम आणि अनुभवी कलाकार देखील चित्रपटात आहेत.

नवे आशय-विषय हे मराठी चित्रपटाचं वैशिष्ट्यं. वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट सध्या मराठीत येत असून या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. मराठीत सध्या येणाऱ्या चित्रपटांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटांची नावे देखील खूप वेगळी असतात. आता असाच एक वेगळ्या नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचे नाव परफ्युम असून या चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

परफ्युम असं सुवासिक नाव असलेल्या चित्रपटातून वेगळीच प्रेमकहाणी १ मार्चला प्रेक्षकांपुढे येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाँच करण्यात आले. याप्रसंगी कलाकार मंडळी आवर्जून उपस्थित होती. 'हलाल'सारख्या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या, तसेच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'लेथ जोशी' या चित्रपटाची प्रस्तुती केलेल्या अमोल कागणे फिल्म्सच्या अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांनी 'परफ्युम'ची प्रस्तुती केली आहे तर एचआर फिल्म डॉमच्या डॉ. हेमंत दीक्षित आणि ओंकार दीक्षित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

ओंकार दीक्षित आणि मोनालिसा बागल परफ्युम या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये असून पोस्टरवरून ही सस्पेन्स-थ्रिलर प्रकारची प्रेमकहाणी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे कथानकात काय काय वळणं असतील याची उत्सुकता या पोस्टरवरून निर्माण झाली आहेत. त्याशिवाय पोस्टरवरील रंगसंगतीमुळे ही कथा अत्यंत रंगीबेरंगी आणि व्हायब्रंट असेल, असाही अंदाज आपल्याला लावता येतो. म्हणूनच हा परफ्युम नक्कीच दरवळेल आणि प्रेक्षकांना आकर्षित करून घेईल यात शंका नाही. 

परफ्युम या चित्रपटाचे दिग्दर्शन करण तांदळे यांनी केले असून त्यांनीच कॅमेरामन म्हणून देखील काम पाहिले आहे. चित्रपटाची कथा किशोर गिऱ्हे यांची असून प्रोडक्शन हेड स्वप्निल दीक्षित आहे. ओंकार आणि मोनालिसा यांच्यासह परफ्युम या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर, अभिजित चव्हाण, सयाजी शिंदे, अनिल नगरकर, कमलेश सावंत, भाग्यश्री न्हालवे, शिल्पा ठाकरे, हिना पांचाळ असे उत्तम आणि अनुभवी कलाकार आहेत.

Web Title: Chinmay Mandlekar's perfume movie's poster launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.