'बॉईज-2'च्या 'स्वाती डॉर्लिंग'ची होतेय सर्वत्र चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 03:15 PM2018-10-17T15:15:25+5:302018-10-17T20:00:00+5:30

बॉईज 2 रिलीज झाल्यावर सर्वत्र त्यातल्या मुख्य भूमिकेत असलेल्या मुलांची चर्चा होती. पण बॉईज-2 रिलीज झाल्यावर बॉईजपेक्षा जास्त पॉप्युलर त्यातली ‘स्वाती डॉर्लिंग’च झालेली पाहायला मिळते आहे.

Boyz 2 Movie's Swati Darling became famous | 'बॉईज-2'च्या 'स्वाती डॉर्लिंग'ची होतेय सर्वत्र चर्चा

'बॉईज-2'च्या 'स्वाती डॉर्लिंग'ची होतेय सर्वत्र चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देशुभांगी तांबाळेने साकारली स्वाती डार्लिंगची भूमिकामाझ्यावर कौतुकाचाच वर्षाव होतोय - शुभांगी तांबाळे

 

बॉईज 2 रिलीज झाल्यावर सर्वत्र त्यातल्या मुख्य भूमिकेत असलेल्या मुलांची चर्चा होती. पण बॉईज-2 रिलीज झाल्यावर बॉईजपेक्षा जास्त पॉप्युलर त्यातली ‘स्वाती डॉर्लिंग’च झालेली पाहायला मिळते आहे. ‘स्वाती डॉर्लिंग’ची सिनेमात जेव्हा जेव्हा एन्ट्री होते. तेव्हा थिएटरमध्ये सध्या टाळ्या-शिट्या ऐकायला येतात. शिवाय ‘स्वाती डॉर्लिंग’चे ‘नरू तुझे माझ्यावर प्रेमच नाही’,  ‘वळण स्वभावाला नसले तरीही शरीराला असले पाहिजे’, हा डायलॉग सध्या तरूणाईला खूप आवडताना दिसतो आहे.
सूत्रांनूसार, स्वातीचा सिनेमात उल्लेख बदामाची राणी असाही झाला आहे आणि सिनेमा रिलीज झाल्यावर एक्यांवर भारी पडणारी ती खरंच बदामाची राणी ठरली. तिच्या बोल्ड संवादांनी आणि दिलखेचक अदांमुळे मल्ल्टिस्टारर सिनेमातही ती सर्वांच्या लक्षात राहते आहे.
याबाबत अभिनेत्री शुभांगी तांबाळे सांगते की, 'हा सिनेमा करताना एवढ्या मोठ्या लोकप्रिय सिनेमाच्या सिक्वलचा आपण एक भाग होतो आहोत. आणि आपली लक्षात राहणारी भूमिका आहे, एवढंच मी पाहिले होते. पण माझी भूमिका लोकांना एवढी आवडेल असे खरेतर वाटले नव्हते. सध्या महाराष्ट्रभरातून मला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कधी माझा नंबर शोधून लोक मला आवर्जून फोन करतात. तर काही लोक सोशल मीडियावरून मला भरभरून शुभेच्छा देत आहेत. आजकाल मी जिथे जाईन तिथे फक्त माझ्यावर कौतुकाचाच वर्षाव होतो आहे. त्यामूळे अर्थातच मला खूप आनंद होतो आहे.'
 

Web Title: Boyz 2 Movie's Swati Darling became famous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.