Bollywood's first 'chocolate boy' entry in the first Marathi film, see Trailer! | धकधक गर्लच्या पहिल्याच मराठी चित्रपटात बॉलिवूडच्या ‘या’ चॉकलेट बॉयची एंट्री, पाहा ट्रेलर!

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिच्या करिअरमधील पहिल्या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यामध्ये चक्क बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूरची एंट्री बघावयास मिळत आहे. रणबीर या चित्रपटात एका सुपरस्टारची छोटीशी भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये माधुरीचा अंदाज भावण्यासारखा आहे. कारण तिच्या तोंडून मराठी ऐकताना हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट असल्याचे अजिबातच जाणवत नाही. 

ट्रेलरच्या सुरुवातीलाच ‘राधिका, तुला बकेट लिस्ट’ माहिती आहे काय? असे माधुरीच्या आवाजातील शब्द कानावर पडतात. त्याचबरोबर माधुरीचा मराठमोळा नववारीतील अवताराची झलकही बघावयास मिळते. स्वत:च्या दैनंदिन आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असलेल्या एका महिलेची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते. या चित्रपटात माधुरी प्रेक्षकांना माधुरी सानेच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘बकेट लिस्ट माझी, तुमची आपल्या सगळ्यांची,’ अशी या चित्रपटाची टॅग लाइन असून, सई या व्यक्तिरेखेचा माधुरीच्या आयुष्यात प्रवेश झाल्यानंतर तिच्या आयुष्यात झालेला बदल या चित्रपटात दाखवला जाणार आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात एका दृश्यात दिसणार आहे. या दृश्यात माधुरी म्हणतेय की, तिला पण सेल्फी हवा होता, तोपण रणबीर कपूरसोबत. त्यावर लगेचच रणबीर म्हणतो की, ‘उसमे बुरा क्या हैं’ दरम्यान, सूत्रानुसार या दृश्यासाठी जेव्हा दिग्दर्शकांनी रणबीरशी बोलणी केली. तेव्हा त्याने लगेचच त्यास होकार दिला. एवढेच काय तर त्याचा सीन ओरिजनल करण्यासाठी त्याने मराठीमध्येही काही संवाद साधला. 

दरम्यान, बॉलिवूडमधील बºयाचशा अभिनेत्री सध्या कमबॅकच्या तयारीत आहेत. काही दिवसांपूर्वीच राणी मुखर्जीने ‘हिचकी’च्या माध्यमातून कमबॅक केले. तसेच रविना टंडनने ‘मातृ’मधून ऊर्मिला मातोंडकरने ‘ब्लॅकमेल’मधून मोठ्या पडद्यावर पुन्हा एंट्री केली, तर आता माधुरी या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. माधुरीचा हा चित्रपट २५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 
Web Title: Bollywood's first 'chocolate boy' entry in the first Marathi film, see Trailer!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.