Bollywood artists who appear in 'ABC' | 'अ ब क' मध्ये दिसणार बॉलिवूडचे कलाकार

सैराटच्या यशानंतर मराठीत चित्रपटात सृष्टीत काम करण्याचा मोह प्रत्येकाला झाला आहे. यात बॉलिवूड तरी मग कसे मागे राहिल बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी मराठीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मराठीतील एका आगामी चित्रपटात बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी दिसणार आहे. अ ब क या मराठी चित्रपटाचा मुहुर्त सुनील शेट्टीच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमृता फडणवीस ही उपस्थिती होत्या. या चित्रपटात सनी पवार, नवाजुद्दीन सिद्दकी, तमन्ना  भाटिया, सुनील शेट्टी, तन्वी सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकुमार शेडगे करण्यार आहेत. या चित्रपटाची निर्मिती मिहीर कुलकर्णी यांनी केली आहे. याचित्रपटाच्या माध्यमातून मुला-मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींना सुद्धा दर्जात्मक शिक्षण दिले पाहिजे असा संदेश देण्यात आला आहे.  अ ब क ला  राहुल रानडे यांनी सांगीत दिले आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय असे कि हा चित्रपट एकाच वेळी मराठी,हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, अशा पाच भाषेत निर्माण होणार आहे. या चित्रपटासाठी अमृता फडणवीस पार्श्वगायन करणार आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण १५ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. सनी पावरने लहानवयात हॉलिवूडमध्ये देखील आपला जलवा दाखवला आहे. लयान या हॉलिवूड पटात सनी झळकला होता इतकेच नाही तर त्याच्या या सिनेमाला ऑस्करमध्ये नॉमिशेनदेखील मिळाले होते. या चित्रपटासाठी सनीची निवड तब्बल दोन हजारा मुलांमधून झाली होती. नवाजुद्दीन सिद्दकी, तमन्ना भाटिया यासारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात दिसणार आहे. 
   

Web Title: Bollywood artists who appear in 'ABC'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.