Bicycling movie teaser audience visit | सायकल या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस

कॉफी आणि बरंच काही, & जरा हटके यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश कुंटे यांनी केले होते. त्यांच्या या दोन्ही चित्रपटांची प्रचंड चर्चा झाली होती. कॉफी आणि बरंच काही या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. & जरा हटके या चित्रपटाद्वारे त्यांनी एक मॅच्युर्ड लव्हस्टोरी मांडली होती. या दोन चित्रपटांच्या यशामुळे प्रकाश कुंटे यांच्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. प्रकाश कुंटे आता सायकल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून या चित्रपटात हृषिकेश जोशी, प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती व्हायकॉम18 मोशन पिक्चर्स, द स्टुडिओ करणार आहे. व्हायकॉम18चा आपला मानूस हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानंतर व्हायकॉम18 मोशन पिक्चर्सने त्यांच्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट सायकल असून या चित्रपटाचे पोस्टर काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.
व्हायकॉम18 मोशन पिक्चर्सच्या सायकल या चित्रपटाचा टीझर आपला मानूस सोबत थिएटरमध्ये नुकताच दाखवण्यात आला. टीझर वरून चित्रपट प्रेक्षकांची पसंती मिळवणार अशी प्रेक्षकांना आशा आहे. सायकल या चित्रपटाची कथा स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडातील आहे. या चित्रपटात आपल्याला भारतातील एका छोट्या खेड्यातील कथा पाहायला मिळणार आहे. हे गाव कोकणातले असून हा हलकाफुलका सिनेमा एका विशेष पात्राभोवती फिरणार आहे. हे पात्र केशवचे असून त्याचे त्याच्या सायकलवर अतिशय प्रेम आहे. या सिनेमाच्या लेखिका अदिती मोघे आहेत.
सायकल या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या पोस्टरमध्ये भाऊ कदम, हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव दिसले होते. हा चित्रपट एक कॉमेडी चित्रपट असणार आहे हे पोस्टरवरूनच प्रेक्षकांना कळले होते. या पोस्टरमध्ये प्रियदर्शन आणि भाऊ दोघेही साधूंच्या कपड्यात दिसले होते. हे दोघे भोंदू बाबाची व्यक्तिरेखा साकारत आहेत का हा प्रश्न हा पोस्टर पाहून नक्कीच प्रेक्षकांना पडला होता. या पोस्टरमध्ये प्रियदर्शन, हृषिकेश, भाऊ हे तिथेही सायकलवर बसलेले दिसत होते. प्रियदर्शनने भाऊला डबल सीट घेतले आहे तर हृषिकेश विरुद्ध दिशेने बसलेला होता. 

Also Read : प्रियदर्शन जाधव बनला 'बाहुबली' तर कुशल बद्रीके दिसला 'भल्लालदेव'च्या अवतारात
Web Title: Bicycling movie teaser audience visit
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.