Bhosan and Pallavi's dream journey will be onscreen | ऑनस्क्रीन रंगणार भूषण आणि पल्लवीच्या स्वप्नांचा प्रवास

स्वप्नांचा प्रवास कधी तो एकट्याचा असतो तर कधी कुणाला सोबत घेऊन. अभिनेता भूषण प्रधान सुद्धा स्वप्नांच्या प्रवासाला निघाला आहे. या प्रवासात अभिनेत्री पल्लवी पाटील त्याच्या सोबत आहे. तू तिथे असावे या आगामी मराठी सिनेमातून भूषण आणि पल्लवीची हळवी प्रेमकथा लवकरच आपल्यासमोर उलगडली जाणार आहे. या चित्रपटातील ‘रोज रोज यावे तू स्वप्नात माझ्या, ‘धुंद बेधुंद व्हावे मी स्वप्नात माझ्या’ असे बोल असलेले मधुर प्रेमगीत नुकतेच चित्रित करण्यात आले.

नयनरम्य लोकेशन्सवर शूट करण्यात आलेले हे गीत करताना एक वेगळाच मूड जमून आला. तसेच अनाहुतपणे ओठांवर सजणारं हे गीत तरल प्रेमाची अनुभूती देईल असा विश्वास भूषण व पल्लवीने व्यक्त केला.श्रीकृष्ण राऊत यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीताला बेला शेंडे व स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज लाभला आहे. दिनेश निंबाळकर यांनी  संगीत दिले आहे तर जीतसिंग यांनी गीताचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. जी कुमार पाटील एंटरटेण्मेंटची प्रस्तुती असलेल्या तू तिथे असावे या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत.

भूषण प्रधान, पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा आशिष-दिपक यांची आहे. संगीत दिनेश अर्जुना तर छायांकन बाशालाल सय्यद यांचं आहे. सहनिर्माते आकाश कांडूरवार, प्रशांत ढोमणे, शरद अनिल शर्मा असून कार्यकारी निर्माते रोहितोष सरदारे आहेत.

ALSO READ:On Location Pic:'तु तिथे असावे' नवीन मराठी सिनेमातील कलाकारांचा शूटिंग दरम्यान असा असतो अंदाज

शेअर केलेल्या फोटोत कलाकारांचा देसी अंदाज पाहायला मिळत आहे. एकीकडे सीन कशा प्रकारे शूट झाला याची माहिती घेताना भूषण प्रधान एका फोटोत दिसतोय तर दुस-या फोटोत भुषण आणि जयवंत वाडकर दिलेल्या स्क्रिप्टचे वाचन करताना दिसतायेत.या सिनेमात भुषण प्रधानसह पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, सुनील तावडे, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. सध्या ऑनलोकेश सिनेमाचे शूटिंगचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये कलाकार मिळालेल्या वेळेत मस्त मजा मस्तीही करताना दिसतायेत. एकुणच सगळे कलाकारमंडळी शूटिंग दरम्यान त्यांच्या गावच्या आठवणींनाही उजाळा देताना दिसतायेत.
Web Title: Bhosan and Pallavi's dream journey will be onscreen
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.