Bhau Kadam's main role in the role of "Full-length Interval" on March 23 in the movie theater! | भाऊ कदम ची मुख्य भूमिका असलेला "जगावेगळी अंतयात्रा"२३ मार्चला चित्रपटगृहात!

सध्या मराठी चित्रपटातून सातत्याने नवनवीन प्रयोग होताना दिसताहेत,त्यातच एका नाविन्यपूर्ण विषयाला हात घालणारा चित्रपट म्हणजे "जगावेगळी अंतयात्रा"अल्टीमेट फिल्म मेकर्स प्रा.ली.बनर खाली डॉ.नितीन श्याम तोष्णीवाल निर्मित आणि अमोल लहांडे दिग्दर्शित या चित्रपटात भाऊ कदम, माधव अभ्यंकर ,राजन भिसे ,सुहास परांजपे या दिग्गज कलावंतान बरोबरच सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित , विनम्र भाबल, डॉ.विशाल गोरे आणि शिवानी भोसले या नवोदित कलावंतांचाही समावेश आहे.नोकरी हा आजच्या तरुण पिढीसमोर भेडसावणारा  गंभीर  प्रश्न, त्यात उच्च विद्या विभूषित तरुणांपुढे जर हा विषय आला तर त्या अडचणीं पुढे ते कुठल्या पद्धतीने सामोरे जातात आणि त्यांच्या कर्तुत्वाने ते इतरांपुढे काय आदर्श घालून ठेवतात ही  गंमत या चित्रपटात पाहण्यासारखी आहे. 

गंभीर विषयाला विनोदी अंगाने मांडण्याचा केलेला  प्रयत्न या चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे,हसता हसता एका महत्वाच्या समस्येबाबतही हा सिनेमा विचार करायला प्रवृत्त करणारा असल्याचे दिग्दर्शक अमोल लहांडे यांनी सांगितले.एक नवीन विषय,त्याची केलेली सुंदर मांडणी,त्याला साजेशे कलावंत, त्याच बरोबर आजच्या आघाडीच्या संगीतकार जोडी रोहन-रोहन यांचे उत्तम संगीत,मनाला भुरळ घालणारी गाणी, सिध्दार्थ महादेवन ,महालक्ष्मी अय्यर ,वैशाली सामंत सुरेश वाडकर आणि रोहन प्रधान या सारख्या दिग्गज गायकांचा सुमधुर स्वरसाज या आणि अशा अनेक बाजूनी परिपूर्ण असा हा चित्रपट रसिकांच्या पसंतीस नक्की उतरेल यात शंकाच नाही.येत्या २३ मार्चला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमाव्यतिरिक्त छोट्या पडद्यावर आपल्या धमाकेदार अदाकारीने वेगवेगळ्या रूपात ज्या जोडीने महाराष्ट्राला वेड लावले ती जोडी मोठ्या पडद्यावर धमाका करण्यास सज्ज झालीये.रसिकांच्या घराघरांत पोहचलेली ही जोडी म्हणजे भाऊ कदम आणि कुशल बद्रीके.हे दोघेही अवघ्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडत आहेत.कुशल आणि भाऊ ही जोडी रसिकांचे तुफान मनोरंजन करत असल्यामुळे दोघांना रसिकांकडून भरभरून प्रेम मिळते. या दोघांनी सादर केलेल्या  स्किटवर रसिक भरभरून दाद देत असतात. छोट्या पडद्यावर ही जोडी सुपरहिट असली तरी आता या दोघांची जुगलबंदी रूपेरी पडद्यावरही पाहायला मिळणार आहे. 

‘लूज कंट्रोल’ या चित्रपटात कुशल इंजिनिअरींगच्या उडाणटप्पू विद्यार्थ्याच्या तर भाऊ कदम पोलिसाच्या भूमिकेत आहे. आता ही जोडी एकत्र आल्यावर काय धमाल उडेल हे वेगळं सांगायला नको. या सिनेमातून दोघेही हसवून हसवून प्रेक्षकांच्या डोळ्यातून नक्कीच पाणी काढतील. दोघांच्याही वेगळ्या भूमिका प्रेक्षकांना सिनेमातून बघायला मिळणार आहे ज्या आधी तुम्ही पाहिल्या नसतील. सिनेमात दोघांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका असून वेगळ्या अंदाजातही विनोदवीरांची ही जोडी रसिकांच्या भेटीला येणार असल्यामुळे रसिकांना मनोरंजनाची पर्वणी मिळणार हे मात्र नक्की. हा सिनेमा २३ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Web Title: Bhau Kadam's main role in the role of "Full-length Interval" on March 23 in the movie theater!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.