भाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 08:00 AM2019-01-22T08:00:00+5:302019-01-22T08:00:00+5:30

श्री कामदेव प्रसन्न ही मालिका हंगामा प्लेवर लवकरच सादर केली जाणार आहे.

Bhau Kadam, Sagar Karande and Bhagyashree working together in this project | भाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र

भाऊ कदम, सागर कारंडे व भाग्यश्री मोटे दिसणार एकत्र

googlenewsNext
ठळक मुद्दे श्री कामदेव प्रसन्न वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

विनोदाच्या अफलातून टायमिंगसाठी प्रसिद्ध असलेले भाऊ कदम लवकरच दिसणार आहेत हंगामा प्लेच्या पुढील मराठी ओरिजिनल मालिकेत. या मालिकेचे शीर्षक आहे 'श्री कामदेव प्रसन्न'. त्यांच्यासोबत या मालिकेत प्रमुख भूमिकेत विनोदवीर सागर कारंडे आणि सुपरस्टार भाग्यश्री मोटे दिसणार आहेत. या मालिकेचे तपशील अद्याप उघड करण्यात आलेले नसले, तरी असे समजते की सागर यामध्ये एका लाजाळू आणि अंतर्मुख माणसाची भूमिका करत आहे आणि भाग्यश्रीची व्यक्तिरेखा गुप्तपणे त्याच्यावर प्रेम करणाऱ्या मुलीची आहे. या मालिकेत नामवंत अभिनेते आशा शेलार व विनय येडेकरही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

 या बातमीला दुजोरा देत भाऊ कदम म्हणाले, “हंगामा प्लेच्या श्री कामदेव प्रसन्न या नवीन मराठी मालिकेसाठी मी शूटिंग सुरू केले आहे. या मालिकेतील माझी व्यक्तिरेखा शब्दश: या पृथ्वीवरील नाही! या मालिकेमध्ये मी आयुष्यातील काही मजेशीर प्रसंगांमध्ये सागरला मदत करताना दिसेन. खरे तर माझी व्यक्तिरेखा हाच त्याच्या आयुष्यातील गोंधळाचे कारण आहे. हंगामा प्लेसोबत एका डिजिटल मालिकेत काम करायला मिळत आहे याबद्दल मला आनंद वाटत आहे. डिजिटल माध्यमाने रोचक कथा सांगण्याची संधी दिली आहे आणि कलावंतांना यामुळे कोणत्याही अडसराशिवाय काम करण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे.”

 सागर कारंडे म्हणाला, “मी या मालिकेत एका लाजाळू आणि अंतर्मुख माणसाची भूमिका करत आहे. या माणसाच्या आयुष्यात काही अनोख्या परिस्थिती येतात आणि त्या त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतात. त्याच्या समस्या सोडवण्यासाठी त्याला भाऊ कदमच्या व्यक्तिरेखेने दिलेली मदत स्वीकारावीच लागते आणि त्यामुळे त्याच्या आयुष्यात आणखी गोंधळ होतो. त्यातून काही विनोदी क्षण निर्माण होतात. मला आणि अन्य सर्व कलाकारांना आमच्या अनोख्या अवतारांमध्ये या मालिकेत पाहणे प्रेक्षकांसाठी खूप मजेशीर असेल, अशी खात्री मला वाटते.”
भाग्यश्री मोटे म्हणाली, “आत्तापर्यंत कधीही सांगितल्या गेल्या नाहीत अशा कथा सांगण्यासाठी हंगामा प्लेसारखी व्यासपीठ पुढाकार घेत आहेत ही खूप सुखद बाब आहे. या मालिकेत मी ज्या मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे ती सागरच्या व्यक्तिरेखेवर गुपचूप प्रेम करते. या मालिकेत घडणाऱ्या सर्व गमतीशीर घटनांमागील गुपित काय हे तिला ठाऊक नाही. एक वेगळी व उत्तम लिहिलेली विनोदी कथा असल्याने ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडेल, अशी खात्री मला वाटते.”
हंगामा डिजिटल मीडिया आणि कॅफे मराठी यांची निर्मिती असलेली श्री कामदेव प्रसन्न ही मालिका हंगामा प्लेवर लवकरच सादर केली जाणार आहे.
 

Web Title: Bhau Kadam, Sagar Karande and Bhagyashree working together in this project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.