भाग्यश्रीचा ट्रेडिशनल लूक पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 03:37 PM2019-07-23T15:37:43+5:302019-07-23T15:48:17+5:30

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. 

Bhagyashree mote share traditional photo on social media | भाग्यश्रीचा ट्रेडिशनल लूक पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ !

भाग्यश्रीचा ट्रेडिशनल लूक पाहुन तुम्हीही व्हाल घायाळ !

googlenewsNext

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.  यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती. भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता. 


अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ असाच आहे. रुपेरी पडद्यावर तिचं फारसं दर्शन झालं नसलं तरी आपल्या या  फोटोच्या माध्यमातून तिने रसिकांच्या काळजाचा ठाव घेतलाय.


भाग्यश्री नुकताच तिचा साडीतला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे ज्यामुळे तिच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. भाग्यश्रीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


 भाग्यश्री मोटे लवकरच एका बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे २०१९ हे वर्ष भाग्यश्रीसाठी खास ठरणार आहे.

Web Title: Bhagyashree mote share traditional photo on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.