The beginning of shooting of 'Mithun' Marathi cinema, the role of these artists will be | 'मिथुन' मराठी सिनेमाच्या शूटींगला सुरूवात,या कलाकारांच्या असणार भूमिका

ग्रामीण मातीमधील 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि 'बबन'चे दिग्दर्शक भाऊराव क-हाडे यांनी मराठी चित्रपट व्यवसायात झेंडा रोवला.त्यांचा आदर्श समोर ठेऊन बरेच दिग्दर्शक नवीन प्रयत्न करताना दिसतात.अशाच प्रयत्नांची चुणुक सातारा जिल्ह्यातील कुडाळ या ग्रामीण मातीमधील युवा दिग्दर्शक प्रकाश पवार यांच्या २०१७ मध्ये 'रांजण' या चित्रपटामधून पहायला मिळाली.कोणतेही पाठबळ नसताना एक चांगला प्रयत्न जाणवला.कदाचित हवं तितकं मोठ्या प्रमाणात व्यावसायिक यश मिळालं नसलं तरी दिग्दर्शक म्हणून प्रकाश पवार यांची ताकद नक्कीच जाणवली आणि पुन्हा एकदा तितकीच ताकद जाणवली ती अलीकडेच आलेल्या मिथुन चित्रपटाच्या टिझरमध्ये.फक्त तीन दृश्यामधून 'मिथुन' सिनेमाचा टीझर बरंच काही सांगून जातो.पहिल्या भव्य दृश्यामध्ये एक लहान मुल, एक तरूण मुलगी सायकलवर आणि एक तरूण रांगडा युवक अल्लडपणे धावताना दिसतो.यावरून 'मिथुन' हा खेळकर चित्रपट आहे हे निश्चितच जाणवते.दुसऱ्या प्रसंगात चकाचक रंगीत डोळ्यांना सुखावणारं यात्रेमधील दुकानातील सळसळता तरूणाई भडका वाह आणि शेवटी दोघांनी हातांचा घेतलेला घट्ट विळखा आणि लपवलेली वस्तू… थेट काळजात हात घालते.‘मिथुन’ हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांना प्रभावीत करेल आणि उत्तुंग यशाची भरारी मारेल असा विश्वास प्रकाश पवार यांना वाटतो आहे.आगामी ‘मिथुन’ सिनेमाबद्दल ते सांगतात की,‘मिथुन’ हा पूर्णपणे वास्तवदर्शी असा सिनेमा आहे.यातले मिथुन हे पात्र आजच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करते.आयुष्याकडे गंभीरपणे न पाहणाऱ्या मुलाच्या आयुष्यात काय घडते याबद्दल या सिनेमात भाष्य करण्यात आले आहे.

'बबन' हा चित्रपटाने १० कोटींचा आकडा पार केला असून याच्या मार्केटिंग पद्धतीचा शास्त्रीय अभ्यास केला आहे.राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट 'ख्वाडा' च्या घवघवीत यशानंतर 'बबन' ला मिळत असलेल्या या उदंड प्रतिसादामुळे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची देखील सर्वत्र चर्चा होत असल्याचे पाहायला मिळाले.ग्रामीण भागात या सिनेमाचा बोलबाला अधिक होत असून मुंबईबाहेरील सिनेमागृहात 'बबन' हाऊसफुल ठरला होता.'बबन' सिनेमाच्या वाढत्या मागणीमुळे महाराष्ट्रात या सिनेमाचे शोजदेखील वाढवण्यात आले होते. विशेष म्हणजे दर्जेदार कथानक आणि मांडणीसोबतच 'बबन' सिनेमातील गाणीसुद्धा हिट ठरली होती.त्यापैकी 'मोहराच्या दारावर' या गाण्यावर प्रेक्षक सिनेमागृहात ठेका धरतानादेखील काही ठिकाणी पाहायला मिळाले. यासोबतच सिनेमातील इतर गाण्यांनीदेखील सिनेप्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले असल्यामुळे अवघा महाराष्ट्र 'बबन' मय झाल्याचे पाहायला मिळाले होते. 

Web Title: The beginning of shooting of 'Mithun' Marathi cinema, the role of these artists will be
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.