The beauty of Meera Jagannath will make you wounded, social media gets viral | मीरा जगन्नाथचे हे सोज्वळ सौंदर्य तुम्हालाही करेल घायाळ,सोशल मीडियावर फोटो झाला व्हायरल

गुरुनाथ,राधिका आणि शनायाची जुगलबंदी असलेली 'माझ्या नव-याची बायको' ही मालिका दिवसेंदिवस रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे.प्रत्येक व्यक्तीरेखेनं रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे.या तिघांमध्ये आता आणखीन एका व्यक्तिरेखेची एंट्री झालेली संजनाने अवघ्या काही दिवसांतच रसिकांची मनं जिंकली.काही एपिसोडसाठीच संजना व्यक्तिरेखेचा मालिकेत समावेश करण्यात आला होता.ही भूमिका मीरा जगन्नाथने साकारली आहे.खरंतर संजनाच्या एंट्रीनंतर मालिकेला आणखीन  रंजक वळण मिळाल्याचे पाहायला मिळाले.कारण संजनाची एंट्री होताच पत्नी राधिकाला सोडून शनायावर लट्टु झालेला गॅरी संजनाला पाहताच तिच्यावर फिदा झाल्याचे पाहायला मिळाले होते.मालिकेत काही एपिसोडमुळे एंट्री केलेली संजना म्हणजेच मीरा जगन्नाथचा रिअल अंदाजही खूप भावतोय. मीराने केलेले फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे.मीरा जगन्नाथ मॉडेलिंग क्षेत्रात असल्यामुळे तिचे फोटो लक्षवेधून घेतात.रॉकिंग आणि स्टनिंग स्टाईलसह चेह-यावरील घायाळ करणारे स्माईल यामुळे मीराच्या या फोटोंचीही सोशल मीडियावर खुमासदार चर्चा रंगली आहे. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे खूप कमी वेळेत तिने रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. हा फोटो पाहून तिचा पारंपरिक अंदाज तिच्या फॅन्सना आवडला. तिच्या पारंपरिक लूकची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा तिच्या बोल्ड, हॉट आणि सेक्सी अंदाजाचीही झाली. हा फोटो शेअर करताच तिला अनेक लाईक्स आणि कमेंटस मिळत आहेत.तिच्या इतर अंदाजातील फोटोंप्रमाणे हा फोटोही तुम्हाला घायाळ करेन असाच आहे.


घरवाली आणि बाहरवाली अशा दोघींच्या कचाट्यात सापडलेल्या गुरुनाथची धम्माल रसिकांनी गेल्या वर्षभरात एन्जॉय केली आहे. त्यामुळे 400 एपिसोड्सचा टप्पा पार केलेल्या या मालिकेचे 1000 एपिसोडस होवोत अशाच सा-यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.सुंदर आणि ग्लॅमरस दिसणारी संजना प्रोफेशनल मॉडेल आहे.रसिका सुनील नेहमीच तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अॅक्टिव्ह असते.काही दिवसांपर्यंत तिच्या शेअर केलेल्या फोटोंमधील अधिकाधिक फोटो हे अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत असायचे.एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे असो किंवा मग एकत्र सिनेमाला जाणे असो, प्रत्येक क्षणाचे फोटो रसिकाने आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यामुळे रिल लाइफमध्ये गॅरीवर लट्टू होणारी शनाया म्हणजेच रसिकाचा रिअल लाइफ गॅरी हा सिद्धार्थ चांदेकर तर नाही अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.पण या दोघांनी याबाबत नेहमीच मौन राखणेच पसंत केले होते.पण आता सिद्धार्थ आणि रसिकाचे ब्रेकअप झाले असल्याची चर्चा आहे. 

Web Title: The beauty of Meera Jagannath will make you wounded, social media gets viral
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.