बप्पीदांनी २८ वर्षांनंतर मराठी सिनेमात मारली एंट्री, या सिनेमात घुमणार सुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 12:24 PM2018-11-09T12:24:28+5:302018-11-09T12:27:07+5:30

सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला मी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं असलं तरीही, मला ओळख दिली ती एका मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने अशा शब्दात बप्पीदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Bappi Lahiri make comeback in marathi film after 28 years, fans will b happy | बप्पीदांनी २८ वर्षांनंतर मराठी सिनेमात मारली एंट्री, या सिनेमात घुमणार सुर

बप्पीदांनी २८ वर्षांनंतर मराठी सिनेमात मारली एंट्री, या सिनेमात घुमणार सुर

googlenewsNext
ठळक मुद्देदिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘लकी’ सिनेमातल्या ह्या नव्या गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्णबप्पीदांनी २८ वर्षांनंतर मराठी सिनेमात मारली एंट्रीसंजय जाधव दिगदर्शित 'लकी' लवकरच रसिकांच्या भेटीला

आय एम ए डिस्को डान्सर म्हणत फॅन्सना वेड लावणा-या बप्पीदांचे आता मराठी सिनेमात सूर ऐकायला मिळणार आहेत..तब्बल 45 वर्षांनंतर आता मराठी सिनेसृष्टीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण केले आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘लकी’ या आगामी सिनेमाद्वारे बप्पी लाहिरींचा आवाज मराठी रसिकांना  ऐकायला मिळणार आहे.

 

नुकताच दिवाळीच्या पाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘लकी’ सिनेमातल्या ह्या नव्या गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. ह्या गाण्याला अमितराजने संगीतबध्द केले आहे तर बप्पीदांसोबत पार्श्वगायिका वैशाली सामंतने हे गाणे गायले आहे, रेकॉर्डिंग झाल्यावर बप्पीदांचा भरभरून आशिर्वाद मिळालेला संगीतकार अमितराज म्हणाला, “माझ्या करीयरमधली यंदाची दिवाळी ही सर्वाधिक आठवणीतली ठरली. ज्यांची गाणी लहानपणापासून ऐकत आलो. अशा मोठ्या संगीतकाराकडून आज मी संगीतबध्द केलेल्या गाण्यावर जेव्हा कौतुकाची थाप मिळते. तेव्हा ती दिवाळीतलं सर्वात मोठी भेट असते.”

 

बप्पी लाहिरी म्हणाले, “मराठी सिनेसृष्टीत काम करायला मला खूप आवडते. सत्तरच्या दशकाच्या सुरूवातीला मी हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं असलं तरीही, मला ओळख दिली ती एका मराठी दिग्दर्शकाच्या सिनेमाने. 1975ला आलेल्या राजा ठाकुर ह्यांच्या जख्मी सिनेमामूळे माझे करीयर ख-या अर्थाने सुरू झाले. आणि मी ‘लकी’ ठरलो.

 

ते पूढे सांगतात, “ मराठीत काम करण्याची खूप इच्छा असूनही सततच्या व्यस्ततेमूळे मी काम करू शकलो नाही. तरीही 1990 ला ‘डोक्याला ताप नाही’ सिनेमासाठी मी संगीत दिग्दर्शन केले होते. पण नंतर मराठीत काम करण्याची संधीच आली नाही. आता संजय जाधव ह्यांच्या सिनेमामूळे मी मराठीत परत येऊ शकलो. अमितराजने गाण्याला दिलेली चाल मला आवडली. पटकन ओठांवर रूळेल, असे हे गाणे आहे.  लकी सिनेमासाठी संजय जाधव यांना माझ्या मनापासून शुभेच्छा”

 

दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, “आम्ही खूप लकी आहोत, की बप्पीदांनी लकीमध्ये गाणे गाण्यासाठी होकार दिला. बप्पीदा हे सत्तर, ऐंशी आणि नव्वदीच्या दशकातले खुप मोठे संगीतकार आहेत. त्यांना लकी सिनेमाव्दारे आम्ही मराठी सिनेसृष्टीत घेऊन येतोय, ह्याचा अभिमान वाटतोय”. 'बी लाइव्ह प्रोडक्शन्स' आणि 'ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन' निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिगदर्शित 'लकी' लवकरच महाराष्ट्रातल्या सर्व सिनेमागृहांमध्ये झळकणार आहे.

 
 

Web Title: Bappi Lahiri make comeback in marathi film after 28 years, fans will b happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.