The audience will meet the new song of God movie | देवा सिनेमाचे जराशी जराशी हे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस

नवा जोश, नवा उत्साह आणि प्रदर्शनाची नवी तारीख घेऊन देवा हा आगामी मराठी सिनेमा या वर्षाअखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षकांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा चित्रपट ठरणार आहे. या सिनेमाचे जराशी जराशी हे गाणे नुकतेच कवी गुरू ठाकूरच्या हस्ते लाँच करण्यात आले.  
मुरली नलप्पा यांनी दिग्दर्शित केलेल्या देवा सिनेमातील या गाण्यामध्ये मनमौजी व्यक्तिमत्वाची झलक पाहायला मिळत आहे. हे गाणे स्वतः गुरू ठाकूरने लिहिले आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अंकुश चौधरी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले हे गाणे आयुष्याला नवी दिशा देणारे आणि जगण्याला नवसंजीवनी देणारे आहे. 
इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित देवा सिनेमासाठी आघाडीचे संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी संगीत दिले आहे. जराशी जराशी या गाण्याला हर्षवर्धन वावरे याचा गोड आवाज लाभला असल्यामुळे हे गाणे अधिकच बहरले आहे. येत्या २२ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील इतर गाण्यांप्रमाणे जराशी जराशी हे गाणेदेखील अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. या सिनेमातील एकामोगामाग एक हिट गाणी लोकांसमोर येत आहेत. देवा सिनेमातील ही सर्व गाणी प्रेक्षकांना केवळ अतरंगी किवा सतरंगीच नव्हे तर सुमधुर संगीताची सफरदेखील घडवून आणत आहेत. 
देवा या चित्रपटात अंकूश देवा ही मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील अंकुशचा लूक काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तेव्हापासूनच अंकुशच्या या लुकची चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक वेगळा अंकुश पाहायला मिळत आहे. रंगीत सदरा, फॅन्सी लॉकेट, हातात माळ, इयर रिंग्स आणि केसांची मॉडर्न स्टाईल असा या चित्रपटातील अंकुशचा लूक दिसत आहे. या लूकप्रमाणेच या चित्रपटातील त्याची भूमिकादेखील काहीशी हटके असणार आहे. या चित्रपटात तो प्रत्येकाला मदत करण्यास तत्पर असणाऱ्या एका व्यक्तिची भूमिका साकारणार आहे. तो सगळ्यांचा लाडका असल्याचे आपल्याला चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Also Read : ​अंकुश चौधरी आणि तेजस्विनी पंडितच्या देवा एक अतरंगी या चित्रपटाचे अनोख्या पद्धतीत झाले टीझर लाँच
Web Title: The audience will meet the new song of God movie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.