This artist from the Marathi cinema tells me to be more than Subodh Bhave | ​मराठी चित्रपटसृष्टीतील हा कलाकार सांगतोय सुबोध भावेपेक्षा मी सरस

सुबोध भावे आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता मानला जातो. त्याने अनेक चित्रपटांमध्ये त्याने दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या अभिनयाचे आज अनेक फॅन आहेत. बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली, लोकमान्य-एक युगपुरुष यांसारख्या चित्रपटातील भूमिका तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. सुबोध हा केवळ एक चांगला अभिनेता नव्हे तर एक चांगला  दिग्दर्शक देखील आहे आणि आजवरच्या त्याच्या कारकिर्दीतून त्याने हे सिद्ध देखील केले आहे. कट्यार काळजात घुसली या त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे प्रेक्षक, समीक्षक सगळ्यांनीच कौतुक केले आहे. 
सुबोध एक चांगला अभिनेता असल्याचे आपणा सर्वांनाच माहीत आहे. पण त्याच्या पेक्षा मी एक चांगला अभिनेता असल्याचे नुकतेच मराठी चित्रपटसृष्टीतील एका कलाकाराने म्हटले आहे. त्या कलाकारानुसार सुबोध पेक्षा तोच चांगला अभिनेता आहे. सुबोधपेक्षा मीच सरस अभिनेता आहे असे मराठी चित्रपटसृष्टीतील कोणता कलाकार म्हणाला असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. पण हा कलाकार दुसरा कोणीही नसून सुबोधच्या अगदी जवळचा आहे. सुबोधपेक्षा मीच सरस अभिनेता आहे असे म्हणणारा दुसरा कोणीही नसून तो सुबोध भावेचा मुलगा कान्हा भावे आहे.
कान्हा प्रेक्षकांना सध्या ​उबुंटू या चित्रपटात पाहायला मिळत आहे. या चित्रपटात तो संकेत या भूमिकेत दिसत आहे. कान्हा या चित्रपटात शाळेत दादागिरी करणाऱ्या, नेहमी मस्तीच्या मुडमध्ये असणाऱ्या मुलाची भूमिका साकारत आहे. कान्हा खऱ्या आयुष्यातही खूप मस्तीखोर असून त्याला बडबड करायला खूप आवडते. कान्हाला सुबोध भावेचा मुलगा म्हणून ओळख सांगितलेली आवडत नाही. तो सांगतो, माझे नाव फक्त कान्हा आहे.

subodh bhave with son


तसेच वडिलांच्या अभिनयाच्या बाबतीत त्याला विचारले असता त्याच्या वडिलांपेक्षा तो खूप चांगला अभिनेता आहे असे त्याचे म्हणणे आहे. सुबोधच्या अभिनयाविषयी कान्हा सांगतो, माझ्या वडिलांपेक्षा मी चांगला अभिनेता आहे. मी ही गोष्ट केवळ तुम्हालाच नाही तर बाबांना देखील सांगतो. बाबांचे चित्रपट पाहिल्यानंतर ते चित्रपट अथवा त्या चित्रपटातील त्यांची भूमिका मला आवडली नाही तरी ते स्पष्टपणे त्यांना सांगायला मी घाबरत नाही. 

Also Read : उबुंटू चित्रपटाच्या टीमने लोकमत ऑफिसला दिली भेट

Web Title: This artist from the Marathi cinema tells me to be more than Subodh Bhave
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.