Apsara was completed 10 years after Fame Sonali Kulkarni's career | ​अप्सरा आली फेम सोनाली कुलकर्णीच्या कारकिर्दीला झाली १० वर्षं पूर्ण

सोनाली कुलकर्णीने आज मराठी चित्रपटसृष्टीत तिचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या कारकिर्दीला नुकतेच १० वर्षं पूर्ण झाले असून तिने या विषयी ट्विटरवर देखील लिहिले आहे. तिने बकुळा नामदेव घाटाळे या चित्रपटातील तिचा फोटो पोस्ट करून आजच्या दिवशी १० वर्षांपूर्वी बकुळा नामदेव घोटाळे सिनेमागृहात दाखल झाला आणि मी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असे म्हटले आहे. 
गेल्या १० वर्षांत सोनालीने मराठी चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे. तिने एकाहून एक हिट चित्रपट दिले असून हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. नटरंग या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. तिने अंजिठा, पोस्टर गर्ल, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. बकुळा नामदेव घोटाळे या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. हंपी हा तिचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या चित्रपटासाठी सोनालीने प्रचंड मेहनत घेत आहे. सोनालीचा या चित्रपटातील लूकदेखील खूप वेगळा असणार आहे. या नवीन लूकमुळे सोनालीला खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. स्वरूप समर्थ एण्टरटेनमेन्टच्या योगेश निवृत्ती भालेराव आणि डिजिटल डिटॉक्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून चैतन्य गिरीश अकोलकर यांनी प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचं लेखन आदिती मोघेनं, दिग्दर्शन प्रकाश कुंटेने आणि सिनेमॅटोग्राफी अमलेंदू चौधरी यांची आहे. वेगळा लूक मिळाल्याने सोनालीही खुश आहे. 'आजपर्यंत मी कधीच माझे केस इतके शॉर्ट केले नव्हते. त्यामुळे इतके शॉर्ट करावे असे वाटतही नव्हते. माझ्या या भूमिकेसाठी केस शॉर्ट असावेत, ही प्रकाश कुंटेची आयडिया होती. या भूमिकेत मी आधीपेक्षा वेगळे दिसावे अशी त्याची अपेक्षा होती. या चित्रपटात मी साकारत असलेली ईशा ही टॉम बॉय आहे. तिची आनंद शोधण्याची गोष्ट या चित्रपटात आहे. ती शोधत असलेला आनंद तिला हंपीमध्ये सापडतो का, हे चित्रपटात पाहायला मिळेल. ही भूमिका साकारता खूप मजा आली,' असं सोनालीने सांगितले. 

Also Read : ​म्हणून सोनाली कुलकर्णीने धारण केली शेरॉन स्टोनची हेअरस्टाईल
Web Title: Apsara was completed 10 years after Fame Sonali Kulkarni's career
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.