Annual Convention of the Dance Academy Dance Academy | ​गश्मीर महाजनीच्या डान्स अॅकेडमीचे वार्षिक संमेलन

बॉलिवूड फंक्शन असो की मराठी सिनेसृष्टीचा समारंभ, एकदा का एखादा सोहळा म्हटला की, त्यात जेवढे आयोजक नसतात त्याच्या तिप्पट प्रायोजक पाहायची आता आपल्या डोळ्यांना सवय लागलीय. पण मराठी फिल्म इंडस्ट्रीचा हार्टथ्रोब गश्मीर महाजनी आपल्या अॅकेडमीचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करताना प्रायोजकांचा आधार न घेताच तो स्वत: आयोजित करण्याला प्राधान्य देतो.
गश्मीर महाजनी गेली सतरा वर्षं आपल्या अॅकेडमीचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करतोय आणि वर्षागणिक तो कार्यक्रम अधिकाधिक लॅविश होत चाललाय. गेली दहा वर्षं तर गश्मीरची अॅकेडमी पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आपला कार्यक्रम आयोजित करते. अशा ठिकाणी कार्यक्रम आयोजित केल्यावर सेट्स-लाइट्सपासून ते कॉस्च्युम्सपर्यंत अनेक गोष्टींवर खर्च होतात. पण खर्चाची तमा न बाळगता आपल्या अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांसाठी तो आपल्या खिशातून प्रत्येक गोष्टींवर खर्च करतो.
कार्यक्रमाच्या 15-20 दिवस अगोदरपासून अॅकेडमीचे विद्यार्थी गश्मीच्याच घरी दिवस-रात्र असतात. त्यांचं खाण-पिणं पाहण्यापासून ते त्यांच्या मेकअप-हेअर-अॅक्सेसरीज-कॉस्च्युम, परफॉर्मन्सेससाठीचे प्रॉप्स अशा सगळ्या गोष्टी गश्मीर एकट्याने पाहतो. त्यामुळे गश्मीरचे या कार्यक्रमावर किमान 8 ते 10 लाख खर्च होतात. आपल्या विद्यार्थ्यांना मंच देण्यासाठी तो हे सगळं करतो.”
गश्मीर आपल्य़ा आयोजनाविषयी सांगतो, “वर्षातून एक दिवस येणारा हा दिवस म्हणजे आमच्यासाठी दिवाळी असते. काय करू आणि काय नको, असं आम्हाला झालेलं असतं. त्यात जर मी प्रायोजक आणले तर मग कार्यक्रमाला थोडं मार्केटिंगच स्वरूप येईल. त्यात मराठी-बॉलिवूड सेलिब्रेटींना आणण्यावरही मग भर दिला जाईल आणि मग विद्यार्थ्यांऐवजी तेच लाइमलाइटमध्ये येतील. विद्यार्थ्यांना स्टार बनवण्यासाठी निर्मांण केलेल्या स्टेजवर त्यांचा लाइम लाइट हिरावला जाऊ नये. म्हणून मी प्रायोजकांशिवाय स्वत: सगळं करण्यावर भर देतो. पैसे नंतरही कमावता येतील. विद्यार्थ्यांच्या आनंदापेक्षा ते निश्चितच मोठे नाहीत.” यंदा 21 जुलैला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गश्मीरच्या डान्स अॅकेडमीचा सतरावा वार्षिक समारंभ होत आहे.

Also Read : अमरनाथ यात्रेकरूंना गश्मीर महाजनी वाहणार नृत्याद्वारे श्रद्धांजली!
Web Title: Annual Convention of the Dance Academy Dance Academy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.