Ann Set Last Selfie | आॅन सेट लास्ट सेल्फी

 
          सेल्फी काढण्याचे वेड आज सगळ््यांनाच लागलेले आहे. चित्रपटातील कलाकार देखील प्रत्येक गोष्टीचा सेल्फी काढून तो सोशलसाईट्सवर अपलोड करतात. कलाकारांच्या या सेल्फीला त्यांच्या चाहत्यांकडून लाईक्स देखील मोठ्या प्रमाणावर मिळतात. चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले कि सहकलाकारा सोबतचा झक्कास सेल्फी लगेच अपलोड होतो, एखाद्या नवीन चित्रीकरणस्थळी कलाकार गेले तरी तिथला सेल्फी काढून टाक फेसबुकवर असे प्रकार सध्या सर्रास होताना दिसत आहे. आता हेच पाहा ना, नूकतेच सुबोध भावेने स्वप्नील जोशी सोबतचा एक सेल्फी टविटरवर अपलोड केला आहे. या सेल्फीची गंमत म्हणजे हा फोटो त्याने फुगे या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगच्या शेवटच्या दिवशी क्लिक केला आहे. एवढेच नाही तर सुबोधने प्रेक्षकांची उत्सुकता वाढविण्यासाठी मेनी मोअर टू कम असे देखील लिहिले आहे. आता पाहूयात सुबोध अजून काय काय सरप्राईज देतोय.

Web Title: Ann Set Last Selfie
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.