Aniket Vishwasrao debut in webseries | अनिकेत विश्वासरावचे वेबसीरिजमध्ये पदार्पण, दिसणार वेगळ्या अंदाजात
अनिकेत विश्वासरावचे वेबसीरिजमध्ये पदार्पण, दिसणार वेगळ्या अंदाजात

ठळक मुद्देअनिकेत दिसणार 'पॅडेड की पुशअप' वेबसीरिजमध्ये अनिकेत अंतर्वस्त्र विक्रेत्याच्या भूमिकेत

मालिका, चित्रपट या माध्यमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता अनिेकेत विश्वासराव डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. तो हंगामा प्लेवरील ओरिजनल मराठी शो 'पॅडेड की पुशअप'मध्ये वेगळ्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. 


'पॅडेड की पुशअप' वेबसीरिजमध्ये अनिकेत अंतर्वस्त्र विक्रेत्याची भूमिका करणार आहे. ही विनोदी सीरिज असून यात अनिकेतसोबत तेजश्री प्रधान, किशोरी अंबिये आणि सक्षम कुलकर्णीही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अनिकेतने साकारलेला आदित्य हा एक मध्यमवर्गीय तरुण आहे. कोणत्याही प्रकारची माहिती नसताना अंतर्वस्त्र विकण्याचे आपले काम त्याला सुरूच ठेवावे लागणार आहे. त्याचवेळी आपण हे काम करतोय हे आपल्या बायकोपासून लपवून ठेवायचे आहे आणि सासूच्या संशयी शोधक नजरेपासूनही त्याला वाचायचे आहे. यावर आधारीत सीरिजची कथा आहे.
याबाबत अनिकेत विश्वासराव म्हणाला, 'माझ्यासमोर आलेल्या कथांमध्ये पॅडेड की पुशअप ही सगळयात आगळीवेगळी कथा आहे. आपल्या कामात यशस्वी होण्यासाठी शक्य ते सर्व काही करतानाच बायको आणि सासूपासून हे गुपित लपवून ठेवायचे अशी दुहेरी कसरत या अंतर्वस्त्र विक्रेत्याला करावी लागणार आहे. यातून प्रचंड विनोदी घटना घडतात आणि त्यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. कॅफेमराठी आणि हंगामा प्लेसोबत डिजिटल शो करताना मला फारच आनंद झाला. या माध्यमामुळे मला एक प्रकारचे स्वातंत्र्य मिळाले. हंगामा डिजिटल मीडिया आणि कॅफे मराठीची निर्मिती असलेल्या पॅडेड की पुशअपचे दिग्दर्शन आकाश गुरसाळे यांनी केले आहे. ही सीरिज लवकरच हंगामा प्लेवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.'
अनिकेतला या वेगळ्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे.
 


Web Title: Aniket Vishwasrao debut in webseries
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.