अनिकेत विश्वासराव आणि तेजश्री प्रधान दिसाणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 04:03 PM2018-10-03T16:03:59+5:302018-10-03T16:15:21+5:30

चित्रपट आणि टीव्हीवर विविध प्रकारच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले अनिकेत विश्वासराव आणि तेजश्री प्रधान लवकरच हंगामा प्लेच्या पॅडेड की पुशअप या पहिल्या मराठी ओरिजिनल शोमध्ये एकत्र दिसणार आहेत.

Aniket Vishwasrao and Tejashri Pradhan will be seen together | अनिकेत विश्वासराव आणि तेजश्री प्रधान दिसाणार एकत्र

अनिकेत विश्वासराव आणि तेजश्री प्रधान दिसाणार एकत्र

googlenewsNext
ठळक मुद्देअनिकेत आणि तेजश्री नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसतील असे समजतेकिशोरी अंबिये या तेजश्रीच्या आईच्या आणि अनिकेतच्या सासूच्या भूमिकेत दिसणार

चित्रपट आणि टीव्हीवर विविध प्रकारच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले अनिकेत विश्वासराव आणि तेजश्री प्रधान लवकरच हंगामा प्लेच्या पॅडेड की पुशअप या पहिल्या मराठी ओरिजिनल शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. या कार्यक्रमाचे तपशील अद्याप बाहेर आलेले नसले तरी, अनिकेत आणि तेजश्री नवरा-बायकोच्या भूमिकेत दिसतील असे समजते. पॅडेड की पुशअप हा कॉमेडी शो असून त्यात किशोरी अंबिये ही तेजश्रीच्या आईच्या आणि अनिकेतच्या सासूच्या रूपात दिसणार आहे आणि सक्षम कुलकर्णी अनिकेतच्या जवळच्या मित्राच्या भूमिकेत दिसेल.

अनिकेत विश्वासराव म्हणाला की, पॅडेड की पुशअपमध्ये मी आपल्या बायकोपासून आणि सासूपासून एक रहस्य लपवण्याचा प्रयत्न करत असलेल्या नवऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. आपले रहस्य लपवण्यासाठी तो अनेकदा अत्यंत विनोदी परिस्थितीत अडकतो आणि त्याला त्यातून बाहेर पडायचा मार्ग शोधावा लागतो. हंगामा प्लेसोबत डिजिटल शोमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मला आनंद वाटतो. या माध्यमामुळे आपल्याला इतर कुठे पाहता येणार नाहीत अशा गोष्टी सांगता येतात. तेजश्री प्रधान म्हणाली की, माझी पॅडेड की पुशअपमधली व्यक्तिरेखा मी आतापर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. तिचं तिचा नवरा आणि आईवर प्रेम आहे, दोघांचंही एकमेकांशी अजिबात पटत नाही आणि त्यामुळे तिला कायमच शांततेची भूमिका घ्यावी लागते. हा शो हंगामा प्लेवर येतोय याचा मला आनंद आहे कारण तो प्रेक्षकांना कुठेही, कधीही पाहता येईल. किशोरी अंबिये म्हणाली की, मी एका सासूच्या भूमिकेत आहे जी खूप चिडचिडी आहे आणि तिला आपल्या मुलीचा नवरा अजिबात आवडत नाही. तिचा तिच्या जावयाच्या आयुष्यातील हस्तक्षेप हा वादाचा विषय आहे आणि त्यामुळे अत्यंत विनोदी क्षण निर्माण होतात.

सक्षम कुलकर्णी म्हणाला की, या शोमधला अनिकेतचा सर्वांत जवळचा मित्र म्हणून मी त्याला मार्गदर्शन करतो आणि त्याला त्रासातून दूर ठेवायचा प्रयत्न करतो. इतक्या ताज्यातवान्या कथेवर काम करणे ही आनंदाची गोष्ट होती आणि प्रेक्षकांनी ते पाहावे यासाठी मी उत्सुक आहे.हंगामा डिजिटल मीडिया आणि कॅफे मराठीकडून निर्मित आणि आकाश गुरसळे यांचे दिग्दर्शन असलेला पॅडेड की पुशअप लवकरच हंगामा प्लेवर उपलब्ध असेल. 

Web Title: Aniket Vishwasrao and Tejashri Pradhan will be seen together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.