अनिकेत विश्वासराव व तेजश्री प्रधान पहिल्यांदाच दिसणार एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 06:09 PM2018-10-05T18:09:15+5:302018-10-05T18:10:21+5:30

'पॅडेड की पुशअप' या कार्यक्रमातून दोघेही पहिल्यांदाच नवरा-बायकोची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Aniket Vishwasrao and Tejashri Pradhan will be seen together for the first time | अनिकेत विश्वासराव व तेजश्री प्रधान पहिल्यांदाच दिसणार एकत्र

अनिकेत विश्वासराव व तेजश्री प्रधान पहिल्यांदाच दिसणार एकत्र

googlenewsNext
ठळक मुद्दे‘पॅडेड की पुशअप’ विनोदी कार्यक्रमअनिकेत विश्वासराव व तेजश्री प्रधान पहिल्यांदाच एकत्र


मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासरावचा नुकताच हृदयात समथिंग समथिंग हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री स्नेहा चव्हाण मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारीत असून या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. यानंतर आता अनिकेत एका विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि यात त्याच्यासोबत अभिनेत्री तेजश्री प्रधान मुख्य भूमिकेत असणार आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. 


तेजश्री प्रधान आणि अनिकेत विश्वासराव हे दोघेही लवकरच एका विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हंगामा प्लेच्या ‘पॅडेड की पुशअप’ या कार्यक्रमातून दोघंही पहिल्यांदाच नवरा-बायकोची भूमिका साकारताना दिसणार आहे. यासोबत किशोरी अंबिये आणि सक्षम कुलकर्णी यांच्या विनोदाची फोडणी ‘पॅडेड की पुशअप’मध्ये पाहायला मिळणार आहे. किशोरी अंबिये या अनिकेतच्या सासूच्या भूमिकेत आहे. त्यामुळे विनोदाचा अफलातून तडका ‘पॅडेड की पुशअप’ला असणार आहे. आपल्या बायको आणि सासूपासून एक गुपीत लपवण्याचा प्रयत्न करत असलेल्या नवऱ्याच्या भूमिकेत अनिकेत दिसणार आहे. हे रहस्य लपवताना अनेक विनोदी प्रसंग त्याच्या आयुष्यात घडत जातात. तेव्हा अशा मित्राला त्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिगरी दोस्ताच्या भूमिकेत सक्षम कुलकर्णी असणार आहे. लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेजश्री प्रधान व अनिकेत विश्वासराव यांना एकत्र काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. 
 

Web Title: Aniket Vishwasrao and Tejashri Pradhan will be seen together for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.