नेमक्या कोणत्या विचारात मग्न आहे अमृता ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 08:00 AM2019-06-14T08:00:00+5:302019-06-14T08:00:00+5:30

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते.

Amruta khanvilkar share black and white photo on social media | नेमक्या कोणत्या विचारात मग्न आहे अमृता ?

नेमक्या कोणत्या विचारात मग्न आहे अमृता ?

googlenewsNext
ठळक मुद्देया फोटोला तिने कॅप्शनसुद्धा दिले आहे अमृताचा हा अंदाज तिच्या फॅन्सना भावला आहे

ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या अमृता खानविलकरचे सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतोय. त्याला कारणीभूत आहे तिचे इन्स्टाग्रामवरचे फोटो. 


अमृताचा हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहे. यात ती एका सोफ्यावर बसलेली आहे. या फोटोला तिने कॅप्शनसुद्धा दिले आहे. अमृताचा हा अंदाज तिच्या फॅन्सना भावला आहे. तिच्या या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सोशल मीडियावर अमृता नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.  


आपल्या अभिनय कौशल्याने मराठी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. तसेच 'राझी' व 'सत्यमेव जयते' या हिंदी चित्रपटातूनही तिने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. सध्या ती स्वप्निल जोशीसोबत 'जिवलगा' मालिकेत दिसतेय. या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच अमृताने टीव्ही पदार्पण केले आहे.

तसेच ती 'पाँडिचेरी' सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती दिग्दर्शक सचिन कुंडलकर सोबत पहिल्यांदाच काम करणार आहे. 'पाँडिचेरी' सिनेमात अमृता खानविलकरसह सई ताम्हणकर व वैभव तत्ववादी आणि नानी कुलकर्णी दिसणार आहेत. 

Web Title: Amruta khanvilkar share black and white photo on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.