Amrita Subhash received the heritage of acting from home ... Amrita is the star of this famous actress | ​अमृता सुभाषला घरातूनच मिळाला अभिनयाचा वारसा... या प्रसिद्ध अभिनेत्रींची लेक आहे अमृता

अमृता सुभाषने तिच्या अभिनयाने मराठीतच नव्हे तर बॉलिवुडमध्ये देखील आपले स्थान निर्माण केले आहे. तिच्या भूमिकांसाठी तिला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ती फुलराणी या नाटकामुळे नावारूपाला आलेल्या अमृताने आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. किल्ला, श्वास यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिकांचे आजवर कौतुक झाले आहे. आता ती मैं अॅल्बर्ट अॅनस्टान बनना चाहता हूँ या तिच्या आगामी चित्रपटात एका मूकबधीर स्त्रीची भूमिका साकारणार आहे. अमृता ही खूप चांगली अभिनेत्री असण्यासोबतच ती एक खूप चांगली गायिका आहे. अमृताचा नुकताच १३ मे ला वाढदिवस झाला. अमृता ही ३९ वर्षांची असून तिने तिच्या अभिनयातून प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकले आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अमृताची गणना केली जाते. अमृताला अभिनयाचा वारसा हा तिच्या आईकडून मिळाला आहे. अमृताची आई ही मराठी-बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अमृता सुभाष ही प्रसिद्ध अभिनेत्री ज्योती सुभाष यांची मुलगी आहे. ज्योती सुभाष गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टीचा भाग आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या सगळ्याच भूमिकांचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी भरभरून कौतुक केले आहे. अक्षय कुमारच्या पॅडमॅन या चित्रपटात देखील प्रेक्षकांना त्यांना एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. चि. व चि. सौ. का. या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी त्यांना झी चित्र गौरवचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता. त्यांनी बन मस्का या मालिकेत देखील काम केले होते. 
अमृताचे मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एका अभिनेत्रीसोबत खूप जवळचे नाते आहे. अमृताचे लग्न संदेश कुलकर्णीसोबत झाले आहे. संदेश हा प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा भाऊ असून तो प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. संदेश आणि अमृताचे लव्ह मॅरेज आहे. अमृता आणि सोनाली या नणंद-भावजयांमध्ये खूपच चांगले नाते आहे. त्यांना अनेकवेळा एकत्र पाहाण्यात येते. 

amruta subhash mother

Also Read : अमृता सुभाषच्या नवीन इनिंगबद्दल तुम्ही ऐकले का?
Web Title: Amrita Subhash received the heritage of acting from home ... Amrita is the star of this famous actress
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.