Amrita Khanvilkar Chhalakan with Manoj Vajyapi in the film | मनोज वाजयेपी सोबत अमृता खानविलकर झळकणार चित्रपटात

मराठी रसिकांना आपल्या अभिनयाने आणि नृत्याने अक्षरक्षः वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर... फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही तिने स्वतःला सिद्ध केले आहे. बॉलिवूड चित्रपटांची अमृताला लॉटरी लागली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण बॉलिवूडचा हँडसम हंक जॉन अब्राहामच्या डार्क अॅक्शन थ्रिलर" सिनेमात अमृता वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल नुकतेच अमृताने मीडियाला सांगितले होते आणि आता ती आणखी एका हिंदी चित्रपटात झळकणार असल्याची घोषणा तिने केली आहे. २०१८ मध्ये अमृता आपल्याला एकामागोमाग एक हिंदी सिनेमामध्ये काम करताना दिसणार आहे. नुकतेत तिने राजी सिनेमाचेही शूटिंग पूर्ण केले आहे. राजी सिनेमाची प्रदर्शनाची तारिख अद्याप ठरलेली नाही. राजी सिनेमानंतर आता तिने नवीन दोन हिंदी प्रोजेक्ट हाती घेतले आहेत.
जॉन अब्राहम नंतर आता अमृता मनोज वाजयेपी साबत एका चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी करणार असून निखिल अडवाणी या चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसले तरी या चित्रपटाचे चित्रीकरण काहीच दिवसांत सुरू होणार असल्याचे कळतेय. या चित्रपटात काम करण्यास अमृता चांगलीच उत्सुक आहे. अमृता सांगते, मनोज वाजपेयी हे खूप चांगले अभिनेते आणि माणूस असल्याने त्याच्यासोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. चित्रपटाच्या रिडिंग सेशन्समध्ये मी खूप नव्हर्स होते. पण मनोज सरांनी मला खूप कम्फर्टेबल केले. एका दिग्गज कलाकाराचे मागर्दर्शन या चित्रपटामुळे मला लाभणार असल्याचा मला आनंद होत आहे. यासोबतच माझा राजी देखील चित्रपट काहीच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मी आलिया भट्ट सोबत काम केले आहे. हायवे या चित्रपटानंतर मी आलिया भट्टची चाहती झाली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना ती एक खूप चांगली सहकलाकार असल्याचे देखील मला जाणवले. हिंदी चित्रपटसृष्टीत ज्याप्रकारे काम चालते, त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. माझ्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांनी ज्याप्रकारे प्रेम दिले, त्याप्रकारे माझे हिंदी चित्रपटही प्रेक्षकांनी आवर्जून पाहावेत. 

Also Read : ​अमृता खानविलकर सांगतेय तिच्या फिटनेसचे गुपित
Web Title: Amrita Khanvilkar Chhalakan with Manoj Vajyapi in the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.