Amrish Puri became the grandson of Marathi film maker! | ​अमरीश पुरी यांचा नातू बनला मराठी चित्रपटाचा निर्माता!

आपले आई वडील बॉलिवूडमध्ये असले की, आपण देखील याच क्षेत्रात करियर करावे असे अनेकांना वाटत असते. त्यामुळे अनेक स्टार पुत्र, स्टार कन्या आपल्याला या क्षेत्रात पाहायला मिळतात. बॉलिवूडमध्ये पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर आता त्यांची चौथी पिढी बॉलिवूडवर राज्य करत आहे तर अमिताभ बच्चन, राकेश रोशन यांच्याप्रमाणे त्यांच्या मुलांनीदेखील बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे.
आता आपल्याला एका प्रसिद्ध बॉलिवूडमधील कलाकाराची पुढची पिढी या क्षेत्रात पाहायला मिळणार आहे. अमरिश पुरी यांनी मिस्टर इंडिया, नागिन यांसारख्या चित्रपटात रंगवलेला खलनायक प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. अमरिश पुरी यांनी खलनायकाप्रमाणेच अनेक चित्रपटात साहाय्यक अभिनेत्याची भूमिका देखील खूप चांगल्या प्रकारे साकारली आहे. दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटात त्यांनी साकारलेली सिमरनच्या वडिलांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात ताजी आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता त्यांचा नातू या क्षेत्रात येणार आहे. पण त्यांच्या नातवाने करियरसाठी बॉलिवूड नव्हे मराठी इंडस्ट्रीची निवड केली आहे. त्यांचा नातू आता एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहे.
मनोरंजन आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्यानंतर अंजनेय साठे एन्टरटेनमेंट आता चित्रपटनिर्मितीमध्ये पदार्पण करत आहे. अंजनेय साठे यांना चित्रपटप्रेमाचा वारसा त्यांचे आजोबा म्हणजेच बॉलिवूडचे ‘लाडके’ खलनायक अमरीश पुरी यांच्याकडून मिळाला आहे. या चित्रपटाविषयी बोलताना अंजनेयने सांगितले की, ‘मराठी चित्रपटाची निर्मिती करायची हे बऱ्याच काळापासून मनात घोळत होते. परंतु सगळ्या कुटुंबाला एकत्र बसून बघता येईल अशी एक ‘परफेक्ट फॅमिली फिल्म’ बनवायची होती. ‘जिंदगी विराट’ या चित्रपटाची कथा अशीच धमाल एन्टरटेनिंग आहे.’ 
एका छोट्याशा अतरंगी गावात घडणाऱ्या धमाल गंमती जंमतींवर आधारित जिंदगी विराट हा चित्रपट आहे. हटके नाव, भन्नाट गाणी असलेल्या या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे. अंजनेय साठे एंटरटेनमेंट निर्मित ‘जिंदगी विराट’ येत्या २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Also Read : ​जगण्याची बाप गोष्ट सांगणारा जिंदगी विराट

Web Title: Amrish Puri became the grandson of Marathi film maker!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.